कळंब येथे शेतकरी महिलांचा मेळावा उत्साहात

मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी आणि अनुसया महिला उन्नती केंद्राच्या वतीने बचत गटांच्या महिला आणि कष्टकरी, सामान्य गरीब शेतकरी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर, अरुणा थोरात, आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, शरद बॅंकेच्या संचालिका मोनिका भालेराव, पुष्पलता जाधव, पंचायत समितीच्या माजी सदस्या निर्मला भालेराव यांच्यासह विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीच्या सदस्या मंगल भालेराव, कविता चासकर, योगिता वाघ, रोहिणी भालेराव, सुवर्णा भालेराव, राणी पिंगळे, शीला भालेराव, अर्चना कानडे, सुनिता बोराडे, ज्योती निघोट यांच्यासह महिलांनी पुढाकार घेऊन बचत गटाचा मेळावा यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमादरम्यान विठ्ठलवाडी येथील सायली रामदास चिखले या मुलीने नाशिक येथील कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल तिचा किरण वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्योती येवले यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)