कळंब येथे पायीदिंडीचे स्वागत

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथे आलेल्या पायीदिंडी सोहळ्याचे पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे यांनी स्वागत केले. कळंब येथील संगमनेर (सिन्नर-अकोले) ते श्रीक्षेत्र नारायणपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांची गेल्या अठरा वर्षांपासून प्रमोद कानडे यांच्या वतीने सेवा करण्यात येते. दिंडी सोहळ्यामध्ये एकूण 450 वारकरी सहभागी होत असतात. भाविकांना कानडे यांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात येते. या उपक्रमाचे नियोजन विष्णू कानडे, अमित भालेराव, अनिल कानडे, राहुल कानडे, तुषार कानडे, विकास वऱ्हाडी, संतोष थोरात यांनी केले. पायी दिंडी कार्यक्रम सोहळ्याच्या वेळी उषा कानडे समवेत भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कानडे, बाबूराव कानडे, खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष किसन कहडणे,गणेश कानडे, मळगंगा टस्टचे माजी अध्यक्ष पोपट भालेराव यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)