कळंब येथे आज सामुदायिक विवाह सोहळा

मंचर -कळंब (ता. आंबेगाव) येथे समस्त ग्रामस्थ कळंब यांच्या सहकार्याने व कमलजादेवी सार्वजनिक उत्सव मंडळ व प्रमोदशेठ कानडे मित्रमंडळ आयोजित मोफत सामुदायिक विवाह सोहळा आज (शुक्रवारी) सायंकाळी साडेपाच वाजता कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे आधारस्तंभ माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे व मंडळाचे अध्यक्ष विष्णू कानडे यांनी दिली आहे.

विवाह सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये एकूण 14 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून विवाह सोहळा परंपरा राबवत असून आत्तपर्यंत 350 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. तसेच सर्व सहभागी जोडप्यांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 10 हजार रुपये शासकीय अनुदान मिळवून दिलेले आहे. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितींमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पंचायत समितीचे माजी सभापती वसंत भालेराव, माजी संचालक यशवंत कानडे, गंगाधर कानडे, तुकाराम कानडे, बाबुराव कानडे, संचालक रमेश कानडे, उत्तम थोरात, सूर्यकांत थोरात, किसन कहडणे, सरपंच राजश्री भालेराव, मोनिका भालेराव, निर्मला भालेराव, अंकित जाधव, जयसिंग भालेराव, राजू भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विवाह सोहळ्याचे निमंत्रक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे व सभापती उषा कानडे यांनी दिली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)