कळंब येथील शाळेला वॉटर फिल्टर प्लॅन्ट भेट

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला दहावीच्या 1987च्या बॅंचने 70 हजार रुपये किंमतीचा आर.ओ. वॉटर फिल्टर प्लॅन्ट भेट दिला आहे. शुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याची क्षमता ताशी 100 लीटर आहे. या आर.ओ.वॉंटर फिल्टरचे उद्‌घाटन सेवानिवृत्त आदर्श प्राचार्य बाळासाहेब ढेपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य नानासाहेब नेहे, पर्यवेक्षक चंद्रकांत मुळे, निवृत्त प्राचार्य विलास भालेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत भालेराव, उद्योजक जयवंत थोरात, संदीप कानडे, सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब ढेपे, राजेंद्र भालेराव, राजेंद्र थोरात, प्रदीप कानडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब आरेकर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)