कळंब येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील कळंब कॉलनी ते शिलमळा या डांबरी रस्त्यावरील पडलेले खड्‌डे बुजवण्याची कार्यवाही सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. खड्डे बुजविण्याचा सरपंच राजश्री भालेराव, सभापती उषा कानडे यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात करण्यात आला. दीड किलोमीटरच्या अंतरासाठी दीड लाख रुपये माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आले. यावेळी मळगंगा देवस्थान टस्ट अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव, सखाराम भालेराव, शंकर भालेराव, उद्योजक नितीन भालेराव, सुनील भालेराव, दिलीप भालेराव, बाळासाहेब भालेराव, बाजीराव भालेराव, ठेकेदार अशोक डुकरे, अजित कंदले, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा भालेराव, अशोक गायकवाड, पोपट भालेराव, निलेश भालेराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सभापती उषा कानडे म्हणाल्या की, शासनाने रस्त्यासाठी लाखो रुपये मंजूर केलेले आहेत. ती कामे दर्जेदार व्हावे यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)