कळंब परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

एक लाख 45 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील माळीमळा वस्तीवरील एका शेतकऱ्याच्या बंदिस्त घराचे कुलूप तोडून कपाटामधील अडीच तोळे वजनाची भोरमाळ आणि 70 हजार रुपये असा एकूण एक लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मंगळवारी (दि. 4) पहाटे ही घटना घडली. कळंब परिसरात गेल्या एक महिन्यापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून कळंब परिसरात बंदिस्त घरे फोडण्याचा चोरट्यांनी सपाटा लावला आहे. चोरटे हे कळंब परिसरातील असावेत, अशी शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गणपत वाव्हळ यांच्या घरी चोरी झाली. तसेच द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष दिलीप बबन वऱ्हाडी यांच्या बंदिस्त खोलीचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले. बाहेरगावी राहणाऱ्या लोकांनी आपल्या बंदिस्त घरांमध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नये, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी केले आहे.
मागील झालेल्या चोरीच्या घटनेतील चोरटे आणि येथील झालेल्या घटनेतील चोरटे एकच असण्याची दाट शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. लवकरात लवकर पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कानडे यांनी केली आहे. मंचर पोलीस ठाण्याला मोबाईलद्वारे दिलीप वऱ्हाडी यांनी चोरीची माहिती दिली. सदर घटनेचा पंचनामा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर गायकवाड, एस. एम. मडके, ए. बी. भोसले यांनी केला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)