मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील कळंब आणि परिसरात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देऊन, ढोल ताशांच्या वाद्यात गणेश मुर्तींचे स्वागत गणेश भक्तांनी केले.
यावेळी कळंब परिसरातील एकलहरे, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, चांडोली, लौकी या परिसरातील गणेश भक्तांनी घरगुती आणि परिसरातील मंडळांचे गणपती पारंपारिक वाद्ये वाजवुन लावून उत्साहात मिरवणूक काढून श्रीगणेशाची स्थापना केली. यावेळी पारंपारिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून आले. कळंब येथे घरगुती गणेशमुर्तीची स्थापना करण्यासाठी सकाळपासूनच स्थानिक रहिवासी व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी कळंब येथील प्रसिद्ध मूर्तिकार बाळासाहेब श्रीशेटे आणि बाळासाहेब बेलसरकर यांच्याकडे मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली. या परिसरात कमलजादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ भैरवनाथ मळा, नवतरुण गणेशोत्सव मंडळ शिरामळा, मुंजोबा महाराज मित्र मंडळ माळीमळा, जय शंभूनारायण गणेश मंडळ, श्रीराम गणेशोत्सव मंडळ नांदूर, न्यू स्टार मित्र मंडळ जाधव स्थळ, चौरंगीनाथ गणेश मंडळ बागवस्ती येथे गणेश मंडळांनी मुर्तीची स्थापना केली. मोठ्या भक्तीमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे स्वागत करण्यात आल्याचे पहावयास मिळाले. यावेळी बालचमू मोठ्या उत्साहाने श्रीगणेश मिरवणुकीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)