कळंब परिसरात कडब्याचा भाव वधारणार

कळंब परिसरात काढणीला वेग

कळंब- इंदापुर तालुक्‍यातील कळंब परिसरात ज्वारीच्या काढणीला वेग आला आहे. यंदा पाऊसकाळ कमी झाला असल्यामुळे तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र, उसाला भाव नसल्यामुळे येथील परिसरात ज्वारीचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे. चाऱ्याचा प्रश्‍न निकालात निघणार आहे. यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर समाप्त झाल्यामुळे कडब्याला सुमारे तीन ते चार हजार बाजारभाव मिळण्याची शक्‍यता आहे. कळंब परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. गेल्या दोन वर्षांत ऊस शेतीत घाटा येत आहे. त्यामुळे ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा रब्बी हंगामातील पिके तरारली आहेत. ज्वारीचे प्रमाण वाढले आहे. सध्या ज्वारी काढणीला वेग आला असल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)