कळंब ग्रामपंचायतीत आंबेडकर जयंती साजरी

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये संविधानाचे जनक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन सरपंच राजश्री भालेराव व ग्रामपंचायत सदस्य आशिष कानडे, भरत कानडे यांच्याहस्ते करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती वसंत भालेराव, माजी सरपंच बाळशिराम भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम भालेराव, उद्योजक राजू भालेराव, ज्ञानेश्वर भालेराव, अरुण भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील श्रीशेटे, अरूण कानडे, योगेश मोरे, युवराज भालेराव, गणेश साळवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच राजश्री भालेराव म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व घटकातील समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी समाजात एकीचा संदेश दिला आहे. त्यांच्या संदेशाचे अनुकरण करून सर्व जातीपातींना मुठमाती द्यावी आणि समाजाने एकसंघपणे विकास साधावा, असे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)