कळंब गावात राष्ट्रीय खेळाडू घडले

मंचर-कळंब सारख्या खेड्यातील कित्येक राष्ट्रीय खेळाडू घडल्याचे दिसून येत आहे. गेल्या 26 वर्षांपासून कळंब या ठिकाणी उत्कृष्ट असे कबड्डी स्पर्धांचे नियोजन कमलजादेवी क्रीडा मंडळ करत असल्याचे गौरवोद्‌गार साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी काढले.
कळंब (ता. आंबेगाव) येथे माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कमलजादेवी क्रीडा मंडळ कळंब व समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने 20 वर्षाखालील तरुणांच्या भव्य कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. कबड्डी स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती आणि कबड्डी स्पर्धेचे मार्गदर्शक वसंतराव भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, जयसिंग भालेराव, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, उद्योजक सचिन भालेराव, भरत भालेराव, राजू भालेराव, संजू भालेराव, ग्रामपंचायत सदस्य मुन्ना कानडे, भरत कानडे, सविता भालेराव, रोहिणी भालेराव, सुमन भालेराव, अनिल काळे, प्रफुल्ल थोरात यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात कबड्डी खेळ आता प्रो कबड्डीमुळे चांगलाच गाजू लागला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा आता राष्ट्रीय संघामध्ये सहभागी होताना दिसत आहे. मंचर येथे तालुक्‍यासाठी क्रीडा संकुल उपलब्ध करुन दिले आहे. परंतू त्याचा तरुण पुरेपूर फायदा घेताना दिसत नाही. तरुणांनी शाळेबरोबर खेळांवरही लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट असे नियोजन करण्याकामी अध्यक्ष शशिकांत भालेराव, सचिव निलेश येवले, बैलगाडा मालक नितीन भालेराव, विक्रम भालेराव, सुशील भालेराव, सुनील भालेराव, ग्रामपंचायत सदस्य मुन्ना कानडे, अभिजीत वाईकर, अभिजीत भालेराव, प्रमोद भालेराव, संतोष भालेराव, दत्ता पेंटर भालेराव, गोकुळ भालेराव, मयूर भालेराव, संदीप भालेराव, क्षितीज कहडणे, सिद्धार्थ कानडे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)