कळंबी लुटमारीतील तीन संशयीत विट्यात जेरबंद

11 लाखांच्या दागिने हस्तगत : संशयीतांना दि. 10 पर्यंत कोठडी

वडूज – कळंबी, ता. खटाव येथे डोळ्यात व्यापारच्याच्या मिरचीपूड टाकून 11 लाखांची दागिने लुटणाऱ्या तिघांना औंध पोलिसांनी विटा, जि. सांगलीमध्ये जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे 11 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरट्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी औंध पोलीस, सातारा एलसीबी पथक तसेच विटा पोलीसांनी नाकाबंदी घटनेनंतर आठ-नऊ तासात तीनही संशयितांना विटा येथे पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, मलकापूर कराड येथील सोन्याचे दागिने विकणारे व्यापारी अशोककुमार लोहार यांना आम्हाला पुसेसावळी येथे शोरूम काढावयाचे, तुम्ही गुरुवारी दागिने घेऊन पुसेसावळीला या असे सांगितले होते. त्यानंतर अशोककुमार लोहार पुसेसावळीत आले असता त्यांना एकाने त्यांना दुचाकीवर बसवून कळंबीनजीकच्या कॅनालजवळ आणले. त्याअगोदर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या दोनजणांनी अशोककुमार लोहार यांच्या डोळयात मिरची पूड टाकून त्यांच्या जवळील असणारी सोन्याची बॅग हिसकावून पलायन केले. त्यानंतर अशोककुमार यांनी ही माहिती औंध पोलीसांना दिली. त्यानंतर औंधचे सपोनि सुनील जाधव यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली व त्यानंतर दुपारी दोननंतर औंध पोलिसांसह सातारा एलसीबी पथकाने लुटमार करणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरू केला. पुसेसावळी येथील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तपासून तसेच सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणी नाकाबंदी करून संशयित आरोपींना अवघ्या दहा तासात विटा येथे जेरबंद केले.

यामध्ये श्रीकांत माळाप्पा केंगार वय 19, सोमनाथ जालिंदर आवळे वय 23, सोनल तुकाराम लोटके वय 22सर्व रा.विटा जि.सांगली यांना अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 69 हजार 120 रुपयांच्या 34 सोन्याच्या लहान अंगठ्या, 2 लाख 38 हजार 32 रुपयांचे कानातील 42 टॉप्स, 4 लाख 46 हजार 850 रुपयांचे कानातील सोन्याचे खडे असलेले 121जोड, 1लाख 66 हजार रुपयांचे सोन्याचे खडे असलेले कुडकी प्रकारचे 51 जोड असा एकूण 11 लाख 20 हजार 2 रूपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला आहे. हे सर्व दागिने सुमारे चाळीस तोळे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे,सपोनि सुनील जाधव, सातारा एलसीबीचे सपोनि विकास जाधव,विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पिसाळ, उपनिरीक्षक श्रीकांत देव, हवालदार प्रशांत पाटील, दादा देवकुळे, शिवाजी खाडे व पोलीसांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)