कळंबमध्ये शालेय पोषण आहाराची तपासणी

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाची तपासणी शाळा व्यवस्थापन समितीने केली. पोषण आहार चांगला असल्याचा अभिप्राय विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीने दिला. कळंब जिल्हा परिषद शाळेत देण्यात येणाऱ्या भाताची गुणवत्ता व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याची चव स्वतः शाळा व्यवस्थापन समितीने चाखून पाहिली. भेटीदरम्यान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम भालेराव, सदस्य निलेश कानडे, इसाक शेख, माजी तंटामुक्‍ती अध्यक्ष गोकुळ भालेराव, राजेंद्र कानडे, रवींद्र कानडे, तुषार थोरात, मुख्याध्यापक विठ्ठल गभाले यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाराम भालेराव यांनी पोषण आहाराची चव दर्जेदार असल्याचे मत व्यक्‍त केले. मुख्याध्यापक विठ्ठल गभाले यांनी पोषण आहार विद्यार्थ्यांना खाल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)