कळंबमध्ये “व्हीव्हीपॅट’चे प्रात्यक्षिक

मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथे इव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक ग्रामपंचायत चौकात घेण्यात आले. यावेळी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी या मशीनबाबत मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकावेळी तलाठी ए. व्ही. गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी भालेराव उपस्थित होते. आता व्हीव्हीपॅट मशिनच्या साह्याने प्रत्येक मतदाराला त्यांनी केलेले मतदान 7 सेकंदात स्लीपच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यातून मतदाराने केलेले मतदान योग्य उमेदवाराला गेले की नाही, याची खात्री पटणार आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकासाठी व्हीव्हीपॅट मशीन प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात येणार आहे. या मशीनची कॅपॅसिटी ही बाराशे मतदानाची आहे. मशीनचे प्रात्यक्षिक अधिकारी अशोक निकम, हवालदार जे. एम. सापटे हे प्रत्येक गावात वॉर्डवाईज मतदारांना मशीनद्वारे मतदान करून त्याचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. यावेळी ग्रामीणचे संचालक सुनील भालेराव, सोसायटी माजी अध्यक्ष शशिकांत कहडणे, माजी सरपंच शरद भालेराव, दीपक चिखले, प्रमोद भालेराव, दत्तात्रय कहडणे, सुरेश भागवत, भिकाजी भालेराव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार सुषमा पैकीकरी यांच्या पुढाकाराने मतदार जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)