कळंबमध्ये मंगळवारी भरणार आठवडे बाजार

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी आठवडे बाजार सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच निता शेळके होत्या.
कळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामसभेमध्ये साधक बाधक विषयांवर चर्चा झाली.त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्यविषयक चर्चा, कुष्ठरोग निर्मूलनासाठी समिती स्थापन करणे, कुष्ठरोग निर्मूलनासाठी समिती स्थापन करणे. महात्मा गांधी तंटामुक्‍ती अध्यक्ष शिवाजी भालेराव, उपाध्यक्ष दशरथ थोरात यांची फेरनिवड करण्यात आली. दर मंगळवारी आठवडे बाजार सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच प्रामुख्याने कळंबमधील पॉवर हाऊस जवळील आणि शिलमळा वस्ती आढळलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पिंजरा लावण्यासाठी मागणी संदर्भात चर्चा झाली. पावसाने वाडी वस्तीवर पडलेल्या खड्यांमध्ये मुरूम टाकणे, वाड्यावस्त्या आणि गावठाणांमध्ये मच्छरांचा उपद्रव रोखण्यासाठी फवारणी करणे, पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत ज्या लोकांकडे जागा उपलब्ध आहे. त्याची घरकुले मंजुर करून घेणे इत्यादी ठराव ग्रामसभेत करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ. सचिन भालेराव, डॉ. सुहास कहडणे, प्रशांत भालेराव, गणेश कानडे, सदस्या राजश्री भालेराव, सुलोचना कानडे, मंगल थोरात, शिला भालेराव, सुवर्णा भालेराव, पोलीस पाटील तान्हाजी कानडे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष दशरथ भालेराव, शिवसेना नेते शंकर भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व गामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामसभेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये गोकुळ भालेराव, सुनील भालेराव, वासुदेव भालेराव, अमित भालेराव, निलेश कानडे, शशिकांत भालेराव, शरद भालेराव, विठ्ठल भालेराव, नामदेव भालेराव, किशोर भालेराव, गणेश वर्पे यांच्यासह ग्रामस्थांनी झालेल्या साधक बाधक चर्चेत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)