कळंबच्या आंबेडकर कॉलनीत समता बंधन

कुरवली- कळंब (ता. इंदापूर) येथील आंबेडकर कॉलनीमध्ये समता बंधन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व बौद्ध प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते गोरख खंडागळे,बापूराव अर्जुन, लेखक राहूल सवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी धम्म वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते गोरख खंडागळे यांनी रक्षाबंधन करताना बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपले सरक्षंण करण्याची बंधन देते; परंतु समतेचे बंधन आपल्यातील वैरभाव संपला जाऊन एकमेकांशी आपलुकीचे नाते निर्माण करण्यासाठी समता बंधन केले जात असल्याचे सांगितले. यावेळी आंबेडकर कॉलनीतील नागरिकांनी एकमेकांना समता धागा बंधन बांधून माणुसकीचे नाते घट्ट केले. कार्यक्रमासाठी अनिल केंगार, अतुल सावंत, धीरज गडहिरे, औदुंबर हेगडे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)