कळंबकरांच्या कल्पकतेमुळे वाड्यावस्त्यांवर बंगले

मंचर-कळंब गावातील शेतकरी नेहमीच कल्पक पद्धतीने शेती करून आर्थिक उद्धिष्ट साधत आहे. त्यामुळे या परिसरातील वाड्यावस्त्यांवर बंगले उभे राहिले आहे. ग्रामस्थ राजकारणापेक्षा शेतीच्या अर्थकारणाला मोठे महत्त्व देत असल्याने आर्थिक विकास झाला आहे, असे गौरवोद्‌गार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी काढले.
कळंब (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रेची बैठक सुरू असताना दिलीप वळसे पाटील यांनी औपचारिक भेट दिली. यावेळी वळसे पाटील यांचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने व यात्रा कमिटीच्या वतीने माजी सभापती वसंत भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कानडे, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष किसन कहडणे, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष शिवाजी भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, माजी उपसरपंच गंगाराम भालेराव, प्रताप भालेराव, तुकाराम कानडे, शरद भालेराव, बाळशिराम भालेराव, शांताराम भालेराव, किसन भालेराव, भरत कानडे, अनिल भालेराव, अरुण भालेराव, रामचंद्र वाव्हळ, नितीन भालेराव, शशिकांत कहडणे, राजू भालेराव, पांडुतात्या भालेराव, डॉ. सुहास कहडणे, अनिल कानडे, निलेश कानडे, महेंद्रनाथ कानडे, विक्रम भालेराव, माऊली कानडे, सुनील भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शिवाजी भालेराव यांनी दिलीप वळसे पाटील यांना पुणे-नाशिक रस्त्यावरील खड्‌डे आणि दुरावस्थेबाबत लक्ष देण्यास सांगितले असता त्यांनी मिश्‍कीलपणे उत्तर दिले. या रस्त्याचे मालक खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आहेत. हा महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे हा प्रश्‍न त्यांच्याकडे आहे, असे सांगून त्यांनी यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)