कल्याण: सरकारच्या दुर्लक्षामुळे दुर्गाडी किल्ल्याला अवकळा, बुरूज ढासाळला

कल्याण – येथे असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही. पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याची अवकळा झाली असल्याचा दुर्गप्रेमींचा आरोप आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी हा किल्ला महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला भेट दिली होती. स्वराज्याचं आरमार म्हणून या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. विस्तीर्ण खाडीला लागून असलेल्या या किल्ल्याची डागडुजी पुरातत्व खात्यानं कधीही केलेली नाही. अनेकदा नागरिकांनी याविषयी तक्रारही केली तरीही याला टाळटाळ करण्यात आले. त्यामुळे किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभाग याबाबत असमर्थ असेल तर महापालिका या किल्ल्यासाठी पुढाकार घेईल अशी भूमिका देवळेकर यांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)