“कल्याण-विशाखापट्टणम’साठी चक्काजाम

पाथर्डीसाठी बुधवार ठरला आंदोलनवार

पाथर्डी – तालुक्‍यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे बंद पडलेले काम तत्काळ सुरू करावे या मागणीसाठी आम आदमी पक्षासह विविध संघटनांनी शहरात महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले.
राष्ट्रीय महामार्गाच्या नाशिक येथील सहायक अभियंत्यांनी भ्रमण ध्वनीवरुन काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. फुंदेटाकळी ते मेहकरी फाटा हे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासुन सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावर खडीचे ढिगारे व माती टाकण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केवळ एक जेसीबी, एक ट्रॅक्‍टर व तीन ढंपरच्या साह्याने सध्या काम सुरू आहे. वाळुंज, तनपुरवाडी, येथील पुलाचे कामे गेल्या एक वर्षापासुन अपूर्ण आहे. अकोला फाट्यावर खडी टाकून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. काम दर्जेदार व वेळेत करावे यासाठी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत विस ते बावीस अंदोलने केली. मात्र कामात कुठलीही प्रगती झालेली नाही.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. महामार्गाचे काम तत्काळ सुरू करून दोषी ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. नायब तहसीलदार पंकज नेवसे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी अंदोलकांशी चर्चा केली. राष्ट्रीय महामार्गाचे नाशिक येथील सहायक अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्यासाठीचा अहवाल मुंबई येथे सादर करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, बहुजन क्रांती पक्षाचे ऍड. सतीष पालवे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के, सुनिल पाखरे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, अकोला ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण पालवे, माजी उपसरपंच उध्दव माने, ग्रा.पं. सदस्य संभाजी गर्जे, बाळासाहेब शिरसाट, बप्पासाहेब डुकरे, भास्कर दराडे, अविनाश टकले, अनिल पालवे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष गोरक्ष ढाकणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)