कल्याण पवारने घातली यशाला गवसणी

नागठाणे – कामट्या पवार हा पारधी समाजाचा असून त्याला पहिलीत दाखल केले पासून अंगापूरातील शिक्षक असणारे युवराज कणसे व त्यांची पत्नी संगीता कणसे यांनी पालकत्व स्विकारून त्याला मुलाप्रमाणेच शिक्षणाबरोबर कुस्तीचे धडे दिले. व त्याने या संधीचे सोने करत राज्यस्तरीय यश मिळवित कामट्याने, (कल्याण) पवार केल्याचे दिसून आले राष्ट्रीय स्पर्धेस पात्र ठरला.

पारधी समाजातील. आई-वडिलांची सततची भटकंती. पहिलीत असतानाच त्याच्यातील हे नैसर्गिक गुण त्याचे शिक्षक युवराज कणसे यांनी ओळखले. त्याची जिद्द अन्‌ प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे कामट्याची सहा वर्षांपूर्वी शासनाच्या क्रीडाप्रबोधिनी उपक्रमात निवड झाली. सध्या तो कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेतो. त्याच्या शिक्षण, खेळाच्या खर्चाचा भार शासनातर्फे उचलला जातो. कुस्तीत त्याने प्रावीण्य संपादन केले आहे.

वर्धा येथे नुकत्याच आयोजित राज्य मैदानी स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात त्याने सुवर्णपदक पटकाविले. त्याबद्दल अंगापुर येथील ग्रामस्थांनी त्याचा व कणसे यांच्यासह वैष्णवी कणसे, सिद्धी कणसे, वैभव शेडगे, आश्‍विन भुजबळ, स्वयंम कणसे, प्रतीक कणसे या यशस्वी खेळाडूंचीही सत्कार करून जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)