कल्याण-डोंबिवली पालिकेचे उपायुक्‍त एसीबीच्या जाळ्यात

लाच स्विकारताना संजय घरत यांना अटक : दोन लिपिकांनाही ठोकल्या बेड्या

कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर उपायुक्‍त संजय घरत हे एसीबीच्या जाळ्यात उडकले आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी त्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 27 गावांमध्ये शेकडो अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. यावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे 42 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 35 लाख रुपये देण्याचे ठरले.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातल्या घरत यांच्या दालनात आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास आठ लाख रुपयांचा पहिला हप्ता घरत यांनी स्वीकारला. यावेळी अँटी करप्शन ब्युरोने त्यांना रंगेहाथ अटक केली. घरत यांच्यासह केडीएमसीचे लिपिक ललित आमरे आणि लिपिक भूषण पाटील यांनाही एसीबीने बेड्या ठोकल्या. यानंतर एसीबीने घरत यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यास सुरुवात केली असून त्यांच्या गाड्या, घरांची झडती घेण्यात येत आहे. तर त्यांच्या दालनात या लाचेच्या रकमेसह आणखी काही रक्कमही सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली दिली आहे.

घरत यांच्यावरील या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. घरत यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांच्या निलंबनाचा ठरावही महासभेने केला होता.

आता घरत यांना एसीबीने पकडल्यानंतर कल्याणमध्ये नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. तसेच त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)