‘कल्याण ग्रोथ सेंटर’द्वारे मिळणार उद्योगांना चालना : मुख्यमंत्री

मुंबई : कल्याण येथे रस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. स्थानिकांनी सहकार्य केल्यास वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर ‘कल्याण ग्रोथ सेंटर’साठी जागा निश्चित करण्यात येईल. यासाठी एमएमआरडीएमार्फत हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उद्योगासाठी आता दुसरा पर्याय तयार होण्यासाठी ‘कल्याण ग्रोथ सेंटर’ची उभारणी करण्याची सरकारची योजना आहे. हे काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येईल, स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्थानिकांची मागणी असलेल्या २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सरकार सकारात्मक असून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)