कल्याणी देशपांडेचा हनुमान जयंती पुजेसाठी परवानगीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे – पुणे शहरासह जिल्हाभरात हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेनी हनुमान जयंतीसाठी परवानगी मिळावी, अशा आशयाचा दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.महात्मे यांनी हा आदेश दिला आहे. तिने केलेल्या अर्जामध्ये काहीही तथ्य नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रावरून ती एका टोळीची प्रमुख असल्याचे दिसून येत आहे, असा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.
कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे (46, रा. बालाजी निवास, पाषण-सूस रस्ता) हिच्यावर शहरातील डेक्कन, कोथरूड, हिंजवडी, विश्रांतवाडी, चतु:श्रृंगी, हवेली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिला 8 ऑगस्ट 2016 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणात तिचे साथीदार रवि उर्फ प्रदीप रामहरी गवळी (27, रा. कंदलगाव, मोहोळ, सोलापूर), रवि शिवाजी तपासे (28) याच्यावरही कारवाई करण्यात आली होती. कोथरूड येथील शिवनगरी सोसायटी येथे 20 जुलै 2016 रोजी करण्यात आलेल्या कारवाईत दरम्यान कुख्यात कल्याणी ही तिचा साथीदार रवि तपासे याच्यामार्फत तरूणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी तीन तरूणींची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी रवि शिवाजी तपासे (28, शिवनगरी, कोथरूड) याला 21 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तर कल्याणी आणि रवि गवळी यांना याप्रकरणी 8 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. कल्याणी आणि तिचा साथीदार गवळी या दोघांविरूध्द गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकणारे 15 गुन्हे दाखल आहेत. तसेच कल्याणीचा आणखी गुन्ह्यामध्ये सहभाग असण्याची शक्‍यता आहे. “कल्याणीने तिच्या अधिपत्याखाली संघटीत टोळी निर्माण करून गुन्हा केला आहे. तरूणींना वेश्‍या व्यावसायास प्रवृत्त करून त्यांनी संपत्ती गोळा केली असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती जमा केली आहे. तिने दहशतीच्या जोरावर आर्थिक लाभ मिळण्यासाठी राज्यातील तसेच परराज्यातील तरूणींना आमिष दाखवल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. वेश्‍या व्यावसायासाठी फुस लावून मुलींना पळविणे, त्यांना व्यावसायासाठी धमकाविणे, मारहाणीसारखे प्रकार दाखल आहेत. कल्याणीने तिच्या अर्जामध्ये हनुमानाची भक्त असून 31 मार्च रोजी हनुमान जयंती निमित्त पुजा करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. त्यात तिने 2014 साली हनुमानाचे मंदीराचे नुतणीकरण केले. तेव्हापासून हनुमान जयंती मोठ्या उत्सहाने साजरी करत असून, त्यावेळी महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असल्याचे नमूद केले आहे. त्यासाठी तिने बाणेर येथील मंदीराला भेट देण्यतसाठी, पुजा करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात परवानगी मागितली आहे. त्यासाठी तिने पोलिसांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च देण्याचीही तयारी दर्शवली होती. न्यायालयाने परवानगी दिल्यास त्याचा कोणताही दुरउपयोग करणार नसल्याचे आणि सर्व अटींचे पालन करणार असल्याचे तिने अर्जात अर्जात म्हटले होते. कल्याणीच्या वतीने ऍड. विद्याधर कोसे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या अर्जास विरोध केला होता. त्यानुसार न्यायालायने हा अर्ज फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)