कल्याणमध्ये महिला डॉक्‍टरची आत्महत्या 

कल्याण – कल्याणमध्ये एका महिला डॉक्‍टरने इमारतीवरुन उडी मारुन आमहत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्‍कादायक प्रकार खडकपाडा परिसरातील महावीर हाईट्‌स इमारतीत घडला. घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्राजक्ता कुलकर्णी असे या मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती प्रणव कुलकर्णी हेदेखील डॉक्‍टर आहेत. कल्याणच्या उच्चभ्रू खडकपाडा परिसरातील महावीर हाईट्‌स इमारतीत हे दाम्पत्य सासू-सासरे आणि दोन मुलांसह राहत होते. आज सकाळी सातच्या सुमारास प्राजक्ता कुलकर्णी या त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून आठव्या मजल्यावर गेल्या आणि तिथून त्यांनी खाली उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.याबाबतची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)