कल्याणकारी योजनेतील शिष्यवृत्तीचे धनादेश पडून!

नागरवस्ती विभाग : पात्र लाभार्थ्यांनी धनादेशचा लाभ घ्यावा

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेतील विविध कल्याणकारी योजनेतून गुणवत्ताधारक विद्यार्थी, निःसमर्थ अपंग, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना दिले जाणारे धनादेश अद्याप पडून आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी धनादेश घेवून जावे, असे आवाहन समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून गुणवत्ताधारक, अपंग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. इतर कल्याणकारी योजनेतंर्गत दहावी, बारावीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाते. यात सन 2016-17 या आर्थिक वर्षातील त्रुटीच्या पुर्ततेनंतर 139 लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण 16 लाख 15 हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये इयत्ता दहावीत 85 टक्के ते 90 टक्के गुण संपादन केलेले 68 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे 6 लाख 80 हजार रुपये तर 90 टक्केपेक्षा अधिक गुण संपादन केलेले 61 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपये प्रमाणे 9 लाख 15 हजार रुपये वाटप केले जाणार आहे.

निःसमर्थ (अपंग) कल्याणकारी योजनेतंर्गत मतिमंद मुलांचा किंवा व्यक्‍तींचा सांभाळ करणाऱ्या पालकास प्रत्येकी 24 हजार रुपये वार्षिक दिले जातात. त्यांना एकूण 1 हजार 313 लाभार्थ्यांना 3 कोटी 15 लाख 12 हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतंर्गत सन 2016-17 या आर्थिक वर्षांमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या 86 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकूण 2 लाख 32 हजार वाटप करण्यात येत आहे. त्यातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये वाटप करण्यात येत आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)