कल्याणकारी योजनांना “आधार’ जोडण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली – कल्याणकारी योजनांसाठी “आधार’ क्रमांक जोडण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत सरकारने आज आणखीन तीन महिन्यांनी वाढवली आहे. कल्याणकारी योजनांचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून नागरिकांना मिळण्यासाठी “आधार’ क्रमांकाची जोडणी होणे आवश्‍यक असणार आहे.

आता 30 जून 2018 पर्यंत आधार क्रमांक जोडता येऊ शकेल, असे इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. बॅंक खाते आणि मोबाईल क्रमांकांना “आधार’ जोडण्यासाठी मुदत यापूर्वीच वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठापुढे सुरू असलेल्या “आधार’वैधतेच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)