कलिंग सेनेकडून शाहरुख खानला धमकी 

शाहरुख खान सध्या “झिरो’च्या कामात खूप बिझी आहे. याशिवाय तो पुरुषांच्या हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठीही काम करणार आहे. या स्पर्धेच्या प्रमोशनची जबाबदारी शाहरुखवर आहे. त्यासाठी त्याने ए. आर. रेहमानबरोबर “जयहिंद इंडिया’ या स्पर्धेसाठीच्या अँथमचा टीझरही रिलीज केला आहे. हॉकी वर्ल्ड कपला अजून अवकाश आहे. मात्र त्यापूर्वी त्याला ओडिशातील कलिंग सेनेकडून धमकी मिळाली आहे.

शाहरुख खान जर ओडिशामध्ये आला तर त्याच्या तोंडावर काळी शाई फेकली जाईल, अशी धमकी या सेनेने दिली आहे. या स्पर्धेच्या उद्‌घाटनाला शाहरुख भुवनेश्‍वरला जाणार आहे. त्यावेळी त्याला काळे फासण्यात येईल, असे या सेनेने म्हटले आहे. शाहरुखने केलेल्या “अशोका’ बाबत कलिंग सेनेच्या मनातील राग अद्याप ओसरलेला नाही. “अशोका’ 2001 साली रिलीज झाला होता.

यामध्ये कलिंगाच्या साम्राज्याचा राजा अशोकाच्या रोलमधील शाहरुख बॉलिवूड हिरोप्रमाणे नाचगाणे करताना दाखवले होते. त्यामुळे ओडिशातील सम्राट अशोकाच्या अनुयायी आणि भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. कलिंगांच्या भावना दुखावल्याबद्दल शाहरुखचा निषेध करण्यासाठी 11 नोव्हेंबरला एक रॅलीही काढण्यात आली होती. त्यात शाहरुखची प्रतिमाही जाळली गेली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)