कलिंगड, खरबूज, डाळींब, संत्री, मोसंबीला मागणी

भाव स्थिर : आंब्याची अद्याप अपेक्षित आवक आही

पुणे- मार्केट यार्डातील फळ विभागात उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज, डाळींब, संत्री आणि मोसंबीला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक होत असल्याने या फळांचे भाव स्थिर आहेत. केवळ खरबुजाच्या भावात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. भाव स्थिर असले तरी लिंबामध्ये हिरव्याऐवजी पिवळ्या लिंबाला अधिक मागणी आहे. आंब्यामध्ये अक्षय तृतीयेला अपेक्षित आवक होत नाही. त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आंब्याचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
रविवारी येथील फळबाजारात अननस 7 ट्रक, मोसंबी 40 टन, संत्री 8 टन, डाळींब 30 ते 35 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबाची 5 हजार गोणी, चिक्‍कू 2 हजार डाग, पेरु 80 ते 100 क्रेटस्‌, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबूज 20 ते 25 टेम्पो, सफरचंद 800 ते 1 हजार पेटी, आंबा 8 ते 10 हजार पेटी, द्राक्षे 5 ते 6 टन इतकी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 200-1700, अननस (डझन) : 70-280, मोसंबी : (3 डझन) : 180-350, (4 डझन ) : 60-150, संत्रा : (3 डझन) 200-400, (4 डझन) : 100-220, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 30-130, गणेश 10-25, आरक्‍ता 10-40. कलिंगड : 5-10, खरबूज : 10-20, पपई : 5-15, चिक्‍कू : 100-500, पेरू (20 किलो) : 300-400, सफरचंद : सिमला (25 किलो) : 1500-1800, काश्‍मीर डेलीशियस (15 किलो) 1000-1300, किन्नोर : ( 25 किलो) 2000-2500, सिमला : (25 किलो) 1500-1800. द्राक्षे : तासगणेश (15 किलो) 700-800, सुपर सोनाका (15 किलो) : 1200-1300, थामसन (15 किलो): 500-600. आंबा रत्नागिरी कच्चा हापूस ( 4 ते 8 डझन) 1500 ते 3500, तयार (4 ते 8 डझन) – 2000 ते 4500, कर्नाटक (कच्च्या आंब्याचे भाव) : लालबाग 40- 70, बदाम 50-60, कर्नाटक : पायरी (2 डझन) 250-450, हापूस (2 डझन) 450-700, तोतापुरी 50-40.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)