कलिंगड, खरबुज, लिंबु आणि पपईच्या भावात वाढ

मागणी वाढल्याचा परिणाम : उर्वरित फळे स्थिर

पुणे- सण, उत्सवांचा महिना अशी ओळख असलेला श्रावणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील फळबाजारात सर्व प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे सर्व प्रकारच्या फळांचे भाव स्थिर आहेत. दरम्यान, केरळमध्ये पावसाने हाहाकार घातल्याने बाजारात अननसाची आवक घटली आहे. मात्र, मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे भाव स्थिर आहेत. याखेरीज, लिंबाच्या भावात गोणीमागे 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली असून, आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बॉक्‍समागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
रविवारी येथील बाजारात अननसची 3 ट्रक, मोसंबीची 70 टन, संत्रीची 2 टन, डाळिंबाची 100 ते 150 टन, पपईची 15 ते 20 टेम्पो, लिंबाची 5 ते 6 हजार गोणी, चिक्कूची 500 बॉक्‍स, पेरुची 400 ते 450 क्रेटस्‌, कलिंगडाची 15 ते 20 टेम्पो, खरबुजाची 8 ते 10 टेम्पो, सिताफळाची 8 ते 10 टन, सफरचंदाची अडीच ते 3 हजार बॉक्‍स, आंब्याची 200 ते 300 बॉक्‍स इतकी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 50-150, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-200, (4 डझन ) : 40-80, संत्रा : ( 3 डझन) 150-300, (4 डझन) : 80-130, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 20-70, गणेश 5-25, आरक्ता 10-40. कलिंगड : 5-10, खरबुज : 10-25, पपई : 5-25, चिक्कू : 100-500, पेरू (20 किलो) : 300-500, सिताफळ : 20-125, आंबा : चौसा (5 ते 6 किलो) : 800-1000, लंगडा : 900-1000, प्लम (5 ते 6 किलो) 500-700, नासपती (15 किलो) 700-900, पिअर : 800-1400, सफरचंद : सिमला (20 ते 25 किलो) :1800-3000.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)