कलाश्री महोत्सवाची सांगता

सांगवी – सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळ प्रस्तूत 21 व्या कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता पंडिता कलापिनी कोमकली यांच्या गायनाने झाली. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारांचा कलाश्री पुरस्काराने यावेळी सत्कार करण्यात आला.

जुनी सांगवी येथे संगीत महोत्सवात शेवटच्या अर्थात तिसऱ्या दिवसाची सुरुवात राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तबला वादन व कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायनाने झाली. तिसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात कु. शाश्वती चव्हाण हिचे गायन झाले. तिने राग मुलतानीमध्ये विलंबीत एक तालात आली री शाम व द्रुत त्रितालात तुम बिन मानत नहीं जिया मोरा या बंदिशी अतिशय सुरेल सादर केल्या. त्यानंतर द्रुत एक तालात एक बंदिश व एक कजरी सादर केली. तिला हार्मोनियमवर अविनाश दिघे यांनी साथसंगत केली. दीपक भानुसे (बासरी) व उ. मोहम्मद अस्लम खान (सारंगी) यांच्या जुगलबंदीने रंगत आणली. त्यांना तबला साथ उ. नवाज मिरजकर यांनी केली.

-Ads-

यावेळी यंदाचा कलाश्री पुरस्कार देऊन अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं. प्रभाकर भंडारे यांना नगरसेविका माई ढोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच यावर्षीचा स्व. शकुंतला नारायण ढोरे यांच्या स्मरणार्थ कलाश्री युवा कलाकार पुरस्कार सरोद वादक सारंग कुलकर्णी यांना शिवसेना जिल्हा उप प्रमुख भगवानराव वाल्हेकर यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, मनोहर ढोरे, आरती राव, संजय जगताप, सुलभा गुळवे, ह.भ.प. तुकाराम भाऊ, ह.भ.प. सुभाष ढोरे, मंगेश वाघमारे, गजानन वाव्हळ, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, नंदकिशोर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पंडिता कलापिनी कोमकली यांनी राग केदारमध्ये जोगी जागो रे ही विलंबित एक तालात व जो दिया सुन हरी ही द्रुत तीन तालमध्ये अतिशय लिलया सादर केल्या. त्यानंतर त्यांनी एक तराना व एक भजन गायनाने कार्यक्रमाची सांगता केली. प्रा. नामदेव तळपे व प्राची पांचाळ यांनी सूत्र संचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)