कलावंतांच्या बेल्ह्यात खंडोबा गीताचा सूर

  • मुक्ताई देवीच्या यात्रेत राज्यस्तरीय वाघ्या-मुरळी स्पर्धा
  • 30 फडांचा समावेश

बेल्हे – कलावंताच्या बेल्हे गावात राज्य स्तरीय वाघ्या-मुरळीच्या स्पर्धा रंगल्या. कलावंतानी संबळ वाद्यातून खंडोबा देवाच्या गीतांचे सूर उमटवून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
बेल्हे गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री मुक्ताबाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वाघ्या-मुरळी स्पर्धेत तीस नामांकित वाघ्या-मुरळीच्या फडांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील जयमल्हार जागरण आणि पार्टी या वाघ्या-मुरळी फडात ललेश संतोष जाधव हा अवघ्या आठ वर्षांचा बालकलावंत वाघ्या म्हणून स्पर्धेत सहभागी झाला होता, असे संयोजक कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त अमर गुंजाळ, माजी सरपंच विश्वनाथ डावखर यांनी सांगितले.
बेल्हे येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून श्रावणापासून येणाऱ्या पुढच्या सहाव्या मंगळवारी राज्यस्तरीय वाघ्या-मुरळीच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असून या स्पर्धेत नामांकित कलावंत सहभागी होऊन आपली कला सादर करतात, असे संयोजक बाळकृष्ण शिरतर, जानकू डावखर यांनी सांगितले.
रानमळा येथील संदीप भोसले आणि पार्टी, साकोरी येथील सुरेश कामटकर आणि पार्टी, ढोकी येथील रावसाहेब धरण आणि पार्टी, मढ येथील विजय मोजाड आणि पार्टी, राजुरी येथील शिव मल्हार जागरण आणि पार्टी, नामदेव शिंदे आणि पार्टी, बाळासाहेब गुंजाळ आणि मंगेश भोसले पार्टी, संतोष शिंदे आणि पार्टी, वसंत शिंदे आणि पार्टी या वाघ्या-मुरळी पार्टी कलावंतांनी एका पेक्षा एक सरस खंडोबा देवावरील गीते, लोकगीते सादर केली असल्याचे स्पर्धेचे परीक्षक राष्ट्रपती पुरस्कार विजेते रंगनाथ बाळाजी निचित, अमर गुंजाळ यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)