कलारंग महोत्सवामळे ग्रामीण कलाकारांना व्यासपिठ : बेडकिहाळ

फलटण : कलादालनात कलाकृतींची पाहणी करताना रघुनाथराजे नाईक निंबाळकर.

फलटण, दि. 28 (प्रतिनिधी) – कलेच्या प्रांतात उत्तम कामगिरी करणारे कलाकार ग्रामीण भागातही आहेत. त्यांना व्यक्त होण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज असते. कलारंग महोत्सवाने ही गरज ओळखून स्थानिक कलावंतांना एकत्र करुन कलारंग महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. दरवर्षी हा महोत्सव व्हावा, अशी अपेक्षा, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
मुधोजी मनमोहन राजवाडा परिसरात कलारत्न आर्ट इन्स्टिट्यूट, कलारत्न सर्वसाधारण सहकारी संस्था, मंथन स्कूल ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड आर्ट, क्षितीज सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि जोशी हॉस्पिटल फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलारंग कला महोत्सव 2018च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. प्रसाद जोशी, डॉ. किरणकुमार नाळे, ज्येष्ठ चित्रकार सुरेश लोणकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर, अक्षरलेखक संजय मंगळे, मुख्य आयोजक व स्वागताध्यक्ष संदीपकुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात राजवाडा परिसर व श्रीराम मंदिरात श्रीमंत प्रतापसिंहराजे नाईक निंबाळकर कलादालनाचा शुभारंभ बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. कलादालनातील विविध प्रकारची काष्ठशिल्प, तैलचित्रे यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
महोत्सवाच्या सायंकाळच्या सत्रात अनेक कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. व्यंकटेश देशपांडे, प्रा.रमेश आढाव, जिल्हा केमिस्ट संघटनेचे मार्गदर्शक विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. डिंपल शर्मा (ग्वाल्हेर) शास्त्रीय गायिका यांना पहिला कलारत्न पुरस्कार डॉ. प्रसाद जोशी यांच्या हस्ते देण्यात आला. अन्य कलाकारांचे सत्कार युवराज पवार, किरण बोळे, प्रसन्न रुद्रभटे, कवी ताराचंद्र आवळे व स्वागताध्यक्ष संदीपकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विशाल पवार, सौ.संध्या गायकवाड, डॉ. राजश्री नाळे, सचिन रणवरे, किशोरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. महोत्सवानिमित्त कलारंग स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजक भारती शिंदे, प्रदीप नाळे, आशुतोष कुलकर्णी, सुशांत चोरमले, ओंकार खलाटे, हिम्मत जगताप, नितीन कुंभार, हेमंत जाधव, सुखदेव फुले, अनिल बोबडे, सुनील बोबडे व सहकाऱ्यांनी यशस्वी परिश्रम घेतले. कु.स्वाती कडू यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवासाठी प्रेक्षकांनी भरगच्च गर्दी केली होती.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)