कलाच माणसाला उंचीवर पोहचवते

सदाभाऊ खोत : राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन

सातारा – माणसाच्या आयुष्यात कलेला खुप महत्व आहे. तो गरीबाघरी जन्मला आला की श्रीमंताच्या याला महत्व नाही त्याच्याकडे असलेल्या कलेला महत्व असून तो व्यक्ती त्या कलेची जोपासना आणि तीच्या वाढीसाठी प्रयत्न करतो तोच यशाच्या शिखरावर पोहचतो, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थि होते. प्रत्येक कला माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवते, असे सांगून खोत पुढे म्हणाले, एक हजार लोकवस्ती असलेल्या गावात जन्माला आलो आहे, आयुष्यभर गावात राहिलो, अनेक व्यवसाय केले. तळाच्या माणसांचे प्रश्‍न मांडले, वक्तृत्वाच्या कलेने मी आज इथपर्यंत आलो.

शेतकरी चळवळीचा मंच इथपर्यंत येण्यास कारणीभूत ठरला. तुम्ही कोणाच्या घरात जन्माला आला याचा काही फरक पडत नाही तुमच्या अंगातील कलेला किती पुजता, जोपासता, वाढविता यावर तुमचे यश अवलंबून आहे, प्रत्येकामध्ये काही गुण लपून बसलेले असतात, त्यांच्यातील सुप्तगुण बाहेर पडण्यास असे युवा महोत्सवाचे मंच खुप महत्वाची भूमिका बजावतात असा विश्‍वासही सहपालकमंत्री खोत यांनी शेवटी व्यक्त केला.

युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवामधून राज्य भरातून आलेल युवक कला सादर करणार आहेत. यातून राष्ट्रीय पातळीवर युवकांची निवड केली जाणार, असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले. आभार पद्रर्शन सुनिल कोळी यांनी केले. या युवा महोत्सवास विविध विभागातून युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)