कलागुण विकसित करा, आई-वडिलांचा आदर राखा’

श्रीरामपूर – “शिक्षणाची भीती न बाळगता तसेच तणावाखाली न राहता हसत खेळत शिका. आपल्यातील कलागुण विकसित करा. आई-वडील आणि शिक्षकांबद्दल आदर राखा,’ असे आवाहन सिनेअभिनेत्री राजेश्‍वरी खरात हिने विद्यार्थ्यांना केले.

अशोकनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक आणि स्नेहसंमेलन झाले. माजी आमदार भानुदास मुरकुटे अध्यक्षस्थानी होते. कामगार नेते अविनाश आपटे, सोपान राऊत, उपाध्यक्ष भाऊसाहेब उंडे, अध्यक्ष रावसाहेब थोरात, कोंडिराम उंडे, सुरेश गलांडे, दिगंबर शिंदे, लाल पटेल, भाऊसाहेब कहांडळ, पोपट जाधव, बबन मुठे, नितीन बनकर, अभिषेक खंडागळे, बाबासाहेब ढोकचौळे, भास्कर खंडागळे, कचरदास ललवाणी, नगरसेविका शीतल गवारे, भारती कांबळे, मंजूश्री मुरकुटे, शालिनी कोलते, माणिक पवार, जालिंदर कुऱ्हे, भीमराज देवकर, सुभाष चौधरी, प्रताप भोसले, भाऊसाहेब दौंड, सुरेश कांगुणे, स्नेहल मेटे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुयोग थोरात, दिलीप खंडागळे, सोमनाथ आरंगळे, योगेश राऊत, सुनील गाडेकर, रवींद्र वारुळे, वनिता भराडी, संगीता खंडीझोड, बाबासाहेब पटारे, शिवाजी पटारे, दिलीप साळुंके, सतीश कांगुणे यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य समीर सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपप्राचार्या सुनीता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)