कलाकारांनी जिंकली रसिकांची मने

विविध स्पर्धांना भरभरून दाद; पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पिंपरी – “हसरा नाचरा लाजरा श्रावण आला” या नृत्यातून श्रावणाचे दर्शन आणि “विठूचा गजर” या नृत्यातून भक्तीरसाचा आनंद देत नृत्य कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित लायन्स टॅलंट हंट २०१८ आणि नृत्य महोत्सवातील गायन, वादन, नृत्य स्पर्धांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत ३२३४ डी 2 आणि नृत्यतेज अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा दोन दिवसीय महोत्सव घेण्यात आला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि.29) पार पडला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान, अभिनेत्री शोभा प्रधान, कोरिओग्राफर फिरोज मुजावर, बाल कलाकार पवन मोहिते, ज्येष्ठ अभिनेते रवीकांत तुळसकर, पुण्यकर उपाध्ये आदी उपस्थित होते.

नाट्यछटा स्पर्धेत तन्वी हरी प्रथम, सानुई भाके द्वितीय, आरिशा कुंभार तृतीय आणि ईशान्य राहुरकर याने उतेजनार्थ पारितोषिक पटकावले. वंदन स्पर्धेत अर्चित अग्रवाल प्रथम, शंतनू देशमुख द्वितीय, प्रणव तिकोने आणि आदिती प्रभू हिने उतेजनार्थ बक्षीस मिळविले. गायन स्पर्धेत सिद्धार्थ गुगुळे प्रथम, अनिकेत थोरात द्वितीय, स्पृहा रौमिक तृतीय आणि मोनिशा कुलकर्णी उतेजनार्थ, ग्रुप डान्समध्ये ६-१० वयोगटात राजवीर परदेशी प्रथम, आर्यन तिकोने द्वितीय, निशीता बिर्ला तृतीय. १०-१५ वयोगटामध्ये प्रापती भोईटे प्रथम, आदिती माळी द्वितीय, रिया कछवा हिने तृतीय क्रमांक तर १६ ते ३१ वयोगटात धनेश पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मिसेस आयकॉन उज्वला ठाकर तर मिस आयकॉन म्हणून प्राजक्ता चंद्रात्रे यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात राजस्थानी लोकनृत्य सादर करण्यात आले. “पिया तो से नैना लागे रे” या गाण्यावर नृत्यागंना तेजश्री अडिगे यांनी केलेल्या नृत्याचा रसिकांनी खास आनंद लुटला. कोरिओग्राफर फिरोज मुजावर यांच्या लावणीच्या ठेक्याने रसिकांनाही ठेका धरायला लावला. ७५ वर्षाच्या पद्मजा कुलकर्णी यांनी तरुणांना लाजवेल असा विठूचा गजर हे वारकरी संप्रदायातले नृत्य केले. तर आशुतोष पाटील याने शिवशंकरा यावर बहारदार नृत्य सादर केले. साक्षी तांजे हिने बेली डान्स सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात कलाकारांनी दिवंगत सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांना नृत्यातून श्रद्धांजली वाहली. या जागतिक नृत्यादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांत नृत्य दिग्दर्शक म्हणून ऋतुजा बशेट्टी, पुण्यकर उपाध्ये, मनाली कानेटकर, लखन बगळे, दीक्षा भांडारकर, नमिता तळेकर यांचे मोठे योगदान ठरले. कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती कशाळकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)