कलर्स वाहिनीवरील मराठी “बिग बॉस’वर बंदी आणावी

पुणे : उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देताना प्रदीप नाईक.

टाकवे बुद्रुक (वार्ताहर) – कलर्स वाहिनीवरील मराठी बिगबॉस या मनोरंजनपर कार्यक्रमामध्ये सिने क्षेत्रातील अनेक नामवंत महिला आणि पुरुष कलाकार काम करत आहेत. या कार्यक्रमात वेगवेगळ्या गंमतीशीर खेळ कलाकार खेळत असतात. परंतु या कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र प्रदेश जागतिक मानव अधिकार जनजागर समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आक्षेप घेतले आहेत. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी राजेद्र मुठे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कलर्स वाहिनीवर सध्या मराठी बिग बॉस कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमातील पुरुष कलाकारांकडून महिलांविषयक खालच्या शब्दात भाषा वापरली जात आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली असतानाही या कार्यक्रमात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे.
या कार्यक्रमातून समाजामध्ये कोणताही चांगला संदेश जात नाही. या उलट महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)