कलम 370 रद्द केल्यास काश्‍मिरात तिरंगा राहणार नाही – जावेद अहमद राणा

नवी दिल्ली – जर काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याचा प्रयत्न केला गेला वा 35 ए मध्ये छेडछाड केली, तर काश्‍मीरमध्ये नावालासुद्धा तिरंगा राहणार नाही, असे वादग्रस्त विधाम नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद अहमद राणा यांनी केले आहे. वादग्रस्त विधानांमुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सच्या जावेद अहमद राणा यांनी मंगळवारी आणखी एके वाद्‌ग्रस्त विधान केले आहे. मेंढर गावात एका सभेत बोलताना जावेद राणा यांनी सभेतील उपस्थितांना कलम 370 च्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

जर कलम 370 रद्द करण्यात आले, तर इतर राज्यातील श्रीमंत लोक काश्‍मीरमध्ये येतील आणि तुमचे सारे काही खरेदी करतील. केवळ 370 कलम आहे, म्हणूनच तुमच्यापैकी काही जणांकडे आरबीए, काही जणांकडे एएलसी वा अन्य कॅटेगरीज आहेत. आणि त्यामुळेच तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. जर कलम 370 रद्द झाले, तर तुमचे सर्वस्व संपून जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कलम 370 ला हात न लावण्याची ताकीद देत जावेद राणा यांने तिरंग्याचा अवमान केला आणि सांगितले, की जर 370 रद्द करण्याचा प्रयत्न केला, तर जम्मू-काश्‍मीरमध्ये तिरंग्याच नामोनिशाणही राहणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)