कलबुर्गी हत्याप्रकरणाचा तपास ‘एनआयए’ करु शकत नाही

  केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण 

नवी दिल्ली – कलबुर्गी हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करु शकत नसल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं.एनआयएकडे ज्या गुन्ह्यांचा तपास दिला जातो त्या निकषात कलबुर्गी प्रकरण बसत नाही, असे सरकारने यावेळी कोर्टात सांगितले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए एम खानविलकर, न्या. डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर कलबुर्गी प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाली. या हत्या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी कलबुर्गी यांच्या पत्नीने कोर्टात केली होती. केंद्र सरकारच्या वतीने अॅडिशनल सॉलिसीटर जनरल पिंकी आनंद यांनी कोर्टात बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवता येणार नाही, ते निकषात बसत नाही, असे सरकारने कोर्टात सांगितले. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे सांगितले. कोर्टाने सीबीआय तसेच कर्नाटक व महाराष्ट्र सरकारलाही याबाबत  नोटीस बजावली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)