कलंदर: संकल्प

उत्तम पिंगळे

कित्येक जण नवीन वर्षासाठी काही संकल्प करतात की, या वर्षाला असे तसे करीन. अर्थात वेगवेगळ्या लोकांचे अथवा सेलिब्रिटींचे संकल्प वेगवेगळे असतात. माध्यमे लोकांना “या वर्षी काय विशेष संकल्प’ विचारत असतात. आमच्या खास माणसांनी काही वेगवेगळ्या लोकांकडून व नेत्यांकडून अशा संकल्पांविषयी माहिती मिळवली. त्यातून बाहेर आलेली माहिती देत आहे…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रधानमंत्री : या वर्षी कमीत कमी देशांना भेटी देणार (आता वेळ तरी कुठे आहे म्हणा? निवडणुका कधीही होतील. पंधरा लाखांबद्दल काही कॉमेंट्‌स नाही.)
अमितभाई : रालोआ सोडून गेलेल्यांना पुन्हा आघाडीत सामावण्याचा प्रयत्न करणार व कर्नाटक सरकार पाडण्याची तारीख शोधणार.
राहुल व ममा : एकमेकांसह शक्‍यतो एका स्टेजवर येणार नाही.
ममतादीदी : न्यायालयीन निर्णयावर स्टे आणण्यासाठी एक्‍स्पर्ट अपील कमिटी स्थापन करणार.
मायाबेन : पक्षचिन्ह हडकुळा किंवा कुपोषित हत्ती वापरण्याचा ठराव आणण्याचा संकल्प करणार (त्यामुळे त्या हत्तीची तरी दया येऊन मते मिळतील.)
मुलायमभाई : पक्ष चिन्हांची जाहिरात होण्यासाठी दररोज वीस किलोमीटर सायकल चालवणार.
लालूभाय : मनुष्यालाही चारा खाता येईल का यासाठी तज्ज्ञ समिती पक्षात नेमणार.
महाराष्ट्र मुख्यमंत्री : वेगवेगळी आंदोलने खुबीने हाताळण्याचा निश्‍चय.
उधोजीराजे : काडीमोड घेण्याची सतत गर्जना करत राहणार
इंजिनराज : इंजिनमागे नवे डबे निर्माण करणार.
रामदासजी : दर्जेदार शीघ्र कविता लिहिणार.
काका बारामतीकर : घडाळ्याच्या दोन काट्यांबरोबर आणखी एक रुतणारा काटाही लावणार. (जो मधूनच उलटाही फिरू शकेल.)
सरकारी कर्मचारी : पुढचा वेतन आयोग नेमण्याकरता संप करण्याचा ठराव.
बॅंक कर्मचारी : खासगीकरणास विरोध, एकत्रीकरणांस विरोध व कामाची शैली न बदलण्याचा निश्‍चय.
मुंबई विद्यापीठ : जो निकाल गेल्या वर्षी जास्तीत जास्त दिवस लांबला तो यंदा किमान एक दिवस लवकर लावणार.
मुंबई पालिका : खड्ड्यातूनही खडखडाट न करता आरामात जाणाऱ्या गाड्यांच्या संशोधनासाठी मदत करणार.
एसटी महामंडळ : शिवशाही डेपोतून निघण्यापूर्वीच अपघात होणार की नाही याचा शोध लावणार.
दूध सम्राट : वाढीव दर मिळण्याकरता आंदोलन करण्याचा संकल्प.
शिक्षण सम्राट : दहावीनंतर अकरावी बारावीसाठीही सीईटी घेण्यात यावी यासाठी आंदोलन करणार.
बडे शेतकरी : कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलन
राजकारणी : करदात्याने दिलेल्या पैशातून स्वत:चे वेतन स्वत:च वाढवून घेण्याचा संकल्प.
सामान्य नोकरदार : (इमान इतमानाने कर भरणारा) करांचे दर कमी करण्याची सरकारला सुबुद्धी होवो यासाठी देवाची प्रार्थना करण्याचा संकल्प.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)