कलंदर: रोड शो…

उत्तम पिंगळे

अलीकडे अत्यंत कर्तबगारीने काम करणारे मंत्री म्हणून महाराष्ट्रातील रोडकरींचे नाव सर्वत्र गाजत आहे. केवळ धडाकेबाज काम करतात म्हणून नाही तर ते पक्षातीत काम करत आहेत. अगदी विरोधी गटातील अनेक नेत्यांनी त्यांचे नाव घेतलेले आहे. पूर्वी रोज सरासरी एक-दोन किलोमीटर रस्ते बांधले जात असत. आता तर ते शंभरच्या आसपास प्रतिदिन पोहोचले आहे. भारतासारख्या खंडप्राय देशासाठी हे रस्ते अत्यंत आवश्‍यक आहेतच तसेच जलमार्ग, विमानतळ विकास, विविध शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यासाठी उड्डाणपूल व मेट्रो मार्ग बांधणे आवश्‍यक ठरत आहे. अलीकडे काही मित्रपक्षांनी व त्यांच्या पक्षातील लोकांनी त्यांचे नावं पंतप्रधानपदासाठी थोडे पुढे केलेले आहे. अशा वेळी जर ते पत्रकारांना दिसले तर त्यांची मुलाखत होणारच. परवाच नागपुरात एक पत्रकार त्यांची मुलाखत घेत होता… या मुलाखतीवेळी आम्ही गुप्त रूपाने हजर होतो. त्याची ही सचित्र कहाणी…

पत्रकार : नमस्कार सर, आपले नाव प्रधानमंत्री म्हणून पुढे येत आहे…
रोडकरी : प्रथमत: हे मी तुमच्याकडूनच ऐकत आहे. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून पक्षात जी जबाबादारी मिळेल ती मी पार पाडत असतो व आमचे नेतृत्व आधीच ठरलेले आहे. उगाच माझ्याकडून बाइट घेऊन त्याचा हवा तसा वापर करून, नको तसा अपप्रचार करणार. मला माहीत नाही असे वाटले का?
पत्रकार : नाही हो तसं नाही. बरं ते जाऊ दे सर पण आपल्या कार्याची प्रशंसा होत आहे?
रोडकरी : मी काम करतो ते पूर्ण देशासाठी. मध्यंतरी तुम्ही माझे उद्योगाविषयी भाषण ऐकले असेलच. उद्योगाशिवाय देशाची प्रगती नाही. अनेक टाकाऊ वस्तूंपासून अपण किफायतशीरपणे टिकाऊ वस्तू बनवू शकतो. पण त्यासाठी दूरदृष्टी हवी. तुम्ही पुन्हा माझी ती क्‍लिप पहा.
पत्रकार : पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत तिकडे विरोधी महागठबंधन होत आहे. असेच आता ‘भावासाठी’ खुद्द ‘बहिणाबाई’ निवडणुकीच्या रणांगणात पडल्या आहेत त्यामुळे बंधू म्हणजे युवराजांचे वजन वाढल्यासारखे वाटते. आपले काय मत आहे?
रोडकरी : (रुंद आवाजात) अहो म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार. पण तसा वाटतो तसाही तो नसणार आहे. तुम्ही पहालच. तुम्हाला ते गाणे आठवते का ‘वेदांनाही नाही कळला… त्याप्रमाणेच मी बनवले आहे.
पक्षालाही नाही कळला,
अंतपार याचा
तोकडा ‘राजा’ मंडळींचा

निराकार तो निर्गुण इथंवर
जसा प्रगटला असा ‘पार्टी’वर
उभय ठेविले ‘हात’ मतांवर
पुतळा ‘चाचाजींचा’. .
तोकडा ‘राजा’ मंडळींचा

परब्रह्म तो माने मतांसाठी
‘मेळा’ पाहे तो गंगेकाठी
उभा राहिला भाऊ सावध
जणू कि पीयूंकाचा. .
तोकडा ‘राजा’ मंडळींचा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)