कलंदर: मराठी पंतप्रधान!

उत्तम पिंगळे

परवा महाराष्ट्राच्या सुभेदारांनी भाकीत वर्तवले की भविष्यात मराठी माणूस पंतप्रधान होणार. भाकीत साधेसुधे नव्हते कारण विचार करा की बहुतेक वेळा उत्तर भारतीय आणि त्यातील सुद्धा उत्तर प्रदेशातील बहुतेक पंतप्रधान झालेले आहेत. मनमोहन सिंग, गुजराल, देवेगौडा व मोरारजीभाई असे अपवादही होते. म्हणजे उत्तर प्रदेशाची एकदम मक्तेदारीच होती असे नाही. झालं इकडे महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना आपोआप जाग आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालच काका बारामतीकरांनी आपल्या सहायकास सकाळीच बोलवून घेतले.मराठी माणूस जर पंतप्रधान होणार असेल तर आजच्या घडीला माझा इतके वजनदार व्यक्तिमत्त्व तरी जवळपास दिसत नाही असाच त्यांचा होरा आहे. त्यांनी सचिवाला सांगितले की आपल्या मित्रपक्षांना बोलवून आघाडीसाठी अंतिम चर्चेची तयारी करावी. मग विचार करू लागले की आघाडी झाली की आपल्याच पक्षाला जास्त जागा कशा मिळतील हे पाहावे लागेल. तसेच आघाडीतील मित्र पक्षातील धुरंधर नेतेही कसे पडू शकतील हेही पाहावे लागेल.त्यांच्या आघाडी होऊ घातलेल्या पक्षातील आगदी ‘आदर्श’ नेतेही जागरूक झाले व आपले नांव कसे पुढे येईल याचा विचार करू लागले.

अगदी ‘सुशील’ असे सोलापूरकरही पुन्हा सक्रिय झाले कारण मुख्यमंत्री व त्यानंतर राज्यपाल असे पद त्यांनी भूषवले होते. तसेच लोकसभेमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड असे दणदणीत यश मिळाल्यास आपण निष्ठावंत म्हणूनही आपल्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.त्यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्यास सांगितले तसेच यापुढे पक्षाच्या प्रत्येक बैठकीस हजर राहण्याचेही ठरविले. इकडे स्वाभिमानी कोकणकर व रामदासजी यांनी उगीचच डोळे मिचकावून पाहीले. त्या दोघांनाही माहीत आहे की आपण तेथपर्यंत पोहचू शकत नाही. रामदासजी मनात म्हणून गेले ..
मी बनू शकत नाही “कसा बनेन’?

मुंबई तर जवळचीच दिल्ली तर 1500 किमी. तिकडे सत्ताधारी युतीतही खळबळ उडून गेली. आजवर मातोश्रीने स्वतःसाठी कोणतेही पद घेतले नव्हते त्यामुळे त्यांच्यातील सीनिअर कोहिनूर पंत हुरळून गेले. त्यांनी लोकसभा अध्यक्षपदही भूषविले होते. त्यांनीही सक्रिय होण्याचे ठरविले पीएम पदाची आठवण राहावी म्हणून कोहिनूरमधील अनेक महागड्या कोर्सेसच्या पुढे पीएम असाही शब्द लावला. त्यांच्या सचिवाने विचारले की कोर्सेसच्या पुढे पीएम लावून काय साधणार आहे? त्यावर ते म्हणाले पीएम शब्दांमुळे मला पंतप्रधानपद चांगले लक्षात राहील व विद्यार्थ्यांसाठी त्या कोर्सेसची फी हप्त्याने म्हणजे पर मंथ पीएम अशी करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थीही वाढतील.

खुद्द महाराष्ट्राचे सुभेदार यांना एका पत्रकाराने गाठून विचारलेच की नागपूरमधील या घोषणेने आपण दिल्लीतील वरिष्ठांना नाराज तर केले नाही ना? त्यावर महाराष्ट्राचे सरकार गंभीरपणे हसून म्हणाले की अजूनही आमच्या पक्षात लोकशाही जिवंत आहे म्हणूनच मी स्पष्टपणे बोलू शकतो. आणि मी काही अगदी आताच महाराष्ट्रातून पंतप्रधान बनेल असे म्हंटलेले नाही. भविष्यात व त्याला खूप वेळ आहे अशी सारवासारव केली.पण मग मनातल्या मनात गालात हासू लागले.आता या भाकिताने त्यांनी अनेकांची उगाचच गोची केलेली आहे. मध्येच त्यांच्यातील ‘रोडकरी’ यांनी जे वक्तव्य केले होते त्याला एक प्रत्युत्तरही ठरेल. तसेच सध्याची परिस्थिती अशी आहे की दिल्लीतील वरिष्ठ नक्कीच काही बोलणार नाहीत. पण दिल्लीतील वरिष्ठही थोडे विचार करत आहेत की महाराष्ट्राच्या सुभेदाराने नेमके हे भाकित नागपुरातच का बोलले? काही संघ… .व सुभेदार यांच्यात काही शिजतंय की काय..?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)