कलंदर : निवडणुकीतील ‘नारायण’ 

उत्तम पिंगळे 

पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मध्ये आपणअनेक इरसाल नमुने वाचले असतील त्यातील एक पात्र म्हणजे नारायण. लग्नाप्रमाणेच निवडणुकीमध्येही असे काही लोक असतात.आता आम्ही ठरलो पत्रकार, त्यामुळे प्रत्येक घटना जवळून पाहत असतो. पुलंचे पुस्तक वाचल्यावर मला जाणवले कि निवडणुकीतही असे ‘नारायण’ असतात. आपण पाहतो की मुंबई महापालिकेची निवडणूक घोषित होताच अनेक जणांचे पिढयान पिढया एकाच पक्षाशी बांधलेले आहेत ते कार्यकर्ते सक्रीय होतात. या कार्यकर्त्यांचे नारायण म्हणून कार्य निवडणूक घोषणा झाली की सुरू होते. पक्षाच्या बैठकीत उमेदवार म्हणून कोण असावा यावर यांचे मत नसते. इच्छुक लोकांतील कुणीही घोषित झाला तरी चालते. उमेदवार घोषित झाला की त्यांच्या विभागातील म्हणजे नगरपालिका असेल तर वॉर्ड किंवा विधानसभा असेल तर अनेक अजूबाजूचे वॉर्ड हे त्याचे कार्यक्षेत्र ठरते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मग सर्वप्रथम मतदार याद्या पडताळणे कारण त्यात ‘आपले लोक’ कोण व कोणते लोक आपल्या बाजूने येऊ शकतात याची यादी काढणे. उमेदवाराबरोबर अर्ज दाखल करण्याकरता जाणे. सर्वत्र पोस्टर लावणे तसेच यादीप्रमाणे स्लिपा बनवण्याचे काम त्याचे असते त्या येथून छापणार असतील तेथून त्या कन्फर्म करणे. अशा स्लिपा कार्यकर्त्यांना पुरवणे. दिवस रात्र फक्त निवडणुकीचाच ध्यास. कामातही लक्ष नसते बहुतेक वेळा कामावर सुट्टी घेतलेली असते. पक्ष व उमेदवारांची रक्कम सांभाळणे. कार्यकर्त्यांचे ‘चहापान’ जेवण तसेच त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल पुरवणे यांची जबाबदारीही छोट्या ग्रुपवर टाकणे.

प्रचार सभांचे आयोजन व त्यासाठी लागणारे सर्व खुर्च्या मंडप व्यवस्था करणे. विशेष कलाकार किंवा आर जे वगैरे यांचे कार्यक्रमही त्यातच अरेंज करणे. श्रेष्ठी व उमेदवार यांनी दिलेली रोख रक्कम विविध उपगटांना देऊन त्याचा हिशेब सांभाळणे. प्रचारात हीरीरीने भाग घेऊन उमेदवारांबरोबर प्रत्यक्ष जाणे व घराघरात स्लीप देणे. उमेदवारही त्या वेळी प्रत्येक ठिकाणी त्याला योग्य मान देतात व हे आमचे ‘अमुक अमुक’ (नारायणजी) अगदी अदबशीरपणे ओळख करून देतात.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी तर त्यांच्या अंगात निवडणूकच संचारते. सकाळपासून बूथ मॅनेज करणे कोणाकडे म्हातारी व्यक्ती तसेच अपंग व्यक्ती आहे त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था करणे व अशी व्यक्ती आल्यावर त्याचा प्राधान्याने नंबर लावून देणे. निवडणूक पार पडून गेल्यावर निकालाच्या ठिकाणी हजर राहणे. उमेदवारांच्या बापासाठीही यांनी प्रचार केलेला असतो आता उमेदवारांसाठी.कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळख झालेली असते. पण निवडणूक पार पडल्यावर काय? किंवा निकाल लागल्यावर काय होते?

जर उमेदवार पडला असेल त्याला तोंड न दाखवता गुपचूप बाहेर पडून घरी जाणे. उमेदवार जिंकला असेल तर तोच त्याला तोंड न दाखवता निघून जातो.पुढे उमेदवार कदाचित पदाधिकारी व मंत्रीही बनतो. त्या वेळी हा नारायण त्यांच्यासमोर हात जोडून आपल्या मुलांसाठी कुठे छोटी मोठी नोकरी बघा ही विनंती करीत असतो. त्याच वेळी उमेदवार आपल्या तरूंण मुलाला पुढे आणून या नारायणाला आपल्या मुलाला आता आधी युवा नेता म्हणून पुढे आणायचे आहे तुमच्या मुलाचे पण लगेच नंतर पाहू असे गोंडस आश्वासन देतो.नारायण हा होता तिथेच राहतो व पुढे याच नारायणाचे काम त्यांचा मुलगाही अंगावरती घेतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)