कलंदर : निरुपयोगी मानव? 

उत्तम पिंगळे 

नुकतीच बातमी आली की चीनने अभासी न्यूज अँकर बनवला आहे जो सतत चोवीस तासही बातम्या देऊ शकतो. असा अभासी व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर तो काम करणार आहे. मी थेट प्राध्यापक मराठमोळ्यांकडे गेलो. दिवाळी संपून घरातील आवारावर झाली होती. ही बातमी त्यांना सांगताच त्यांनी बदल हा सर्वत्र होत असतो त्याला औद्योगिकीकरणही अपवाद नाही.

मग प्राध्यापक म्हणाले आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे चाललो आहोत. मला औद्योगिक क्रांती म्हटल्यावर ब्रिटनमधील कापड उद्योग व वाफेचे इंजिन एवढेच आठवते. मग ते म्हणाले की, पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे 18 व 19 व्या शतकात झाली यामध्ये कापड उद्योग, पोलाद, स्टीम इंजिन यांचा महत्त्वाचा वाटा होता. दुसरी औद्योगिक क्रांती 1830 ते 1914 अशी पहिल्या महायुद्धा अगोदर. त्यावेळी वरील उद्योगांची वाढ झाली व तेल वीज व विजेच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती झाली. त्याचवेळी टेलिफोन, बल्ब, फोटोग्राफी तसेच आंतरदहन इंजिन (इंटर्नल कम्बशन इंजिन) यांचा मोठा वाटा होता. तिसरी औद्योगिक क्रांती 1980 नंतर ज्यामध्ये औद्योगिकीकरणात डिजिटल सुधारणा ज्यात पीसी, इंटरनेट व इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी याचा मोठा समावेश झाला.

आता चौथी औद्योगिक क्रांती सुरू झाली असून त्यात वरील डिजिटल क्रांती मोठी व कुशल होत चाललेली असून तिचा वापर जवळजवळ सर्वत्र होत आहे. यात यंत्रमानव (रोबोट) तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) तसेच नॅनो तंत्रज्ञान, थ्री डी प्रिंटिंग, स्वायत्त वाहने असे वा अनेक किती वेगवेगळे प्रकार येणार आहेत. यातही अमेरिका व युरोप आघाडीवर आहेत याचे मुख्य कारण म्हणे त्यांची कमी लोकसंख्या. त्यामुळे कमीत कमी मानवाच्या हस्तक्षेपाने जास्तीत जास्त कसे उत्पादन घेता येईल हे पाहिले जाणार आहे. थोडक्‍यात सांगायचे झाल्यास सायंकाळी तुम्ही फॅक्‍टरीचे गेट लावून गेल्यावर समजा कृत्रिम धाग्यांची कंपनी असेल तर धागे बॉबीनवर लावणे, बॉबीन तयार झाल्यावर बॉबीन काढली जाऊन तेथे रिकामी बॉबीन लावणे तसेच भरलेली बॉबीन योग्य रीतीने परीक्षण करून पॅकिंग होऊन नंतर मोठ्या बॉक्‍समध्ये बंद होऊन पाठवणीसाठी रवाना होणे हे सर्व स्वयंचलित रितीने होणार आहे.

तसेच खाद्यपदार्थांची कंपनी असेल, समजा चिक्‍स बनवायच्या असतील तर बटाटे निवडून, सोलून, त्याच्या चिप्स बनवून तळून त्यात मसाला योग्यरितीने वापरून त्या नायट्रोजन पॅक पिशव्यांमध्ये भरून नंतर बॉक्‍समध्ये भरल्या जाणे हेही सहज शक्‍य आहे. तसेच यात कुठेही माणसांचा हस्तक्षेप असणार नाही. मग तेच पुढे म्हणाले की आपल्याकडे एवढी लोकसंख्या असलेल्या देशात असे करणे शक्‍य नाही कारण आहेत त्यांनाच नोकऱ्या मिळत नाहीत तर या परिस्थितीत असलेल्यांचाही नोकऱ्या जाऊ शकतात. तेथे असे माणूसविरहित काम केल्याने अचूकता व मोठ्या प्रमाणात उत्पादन सहज शक्‍य आहे.

भारताला त्यांच्याशी यापुढे स्पर्धा आणखी कठीण जाणार आहे. चौथी औद्योगिक क्रांती ही मानवविरहित उत्पादन करण्यास चालना देणारी ठरणार आहे. भारताने म्हणूनच आपल्या कामगार वर्गाची उत्पादकता वाढवणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे. कामगार कपात न करता उत्पादन अधिक करणे महत्त्वाचे ठरेल. ते निर्यातक्षमही राहावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)