#कलंदर: घड्याळजी!

– उत्तम पिंगळे

(स्थळ अर्थात बारामती. काका बारामतीकर यांचे राहतं घर. काका काहीतरी वाचत आहेत बाजूला कोणीतरी आहे. एवढ्यात त्यांचे पुतणे येतात आणि विशेष म्हणजे ते एकटेच येतात)

पुतणे : (थोडं वाकून) नमस्कार काका.
काका : अरे असू दे असू दे आज एकदम धुमकेतू सारखे कसे आलात?
पुतणे : हे काय काका? असा धूमकेतू वगैरे काही नाही.
काका : होय? मग पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला दिल्लीत हजर नव्हता त्याचे काय?
पुतणे : (“पक्ष आता राष्ट्रीय राहणार की नाही? हाच खरा प्रश्न आहे) नाही, म्हणजे मला जरा नाही जमलं पण मी तर तुम्हाला आधी कळवलं होतं.
काका : हो पण कधी? एक दिवस अगोदर. आजकाल कोणाचेच पुतणे विश्वासू राहिले नाही हे खरं. बरं एवढे दिवस आला नाहीत आणि आता नेमके पितृपक्षात कसे आलात?
पुतणे : नाही तसं त्याचं काय आहे की पितृपक्षात कुठे जास्त उद्‌घाटने वगैरें नसतात. (काका मनांत एवढे तुम्हाला कोण बोलवते?) म्हणजे तुम्हाला उद्‌घाटने नसतात; म्हणून तुम्ही आरामात भेटाल, असे समजून आलो.
काका : बरं काय विशेष? काही कारण असल्याशिवाय तुम्ही असे अचानक येणार नाही.
पुतणे : (काकांच्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहात) नाही असं सहज… (काका ओळखतात)
काका : त्या व्यक्तीकडे पाहात (बरं मी बघतो. तुम्ही या आता.(ती व्यक्ती नमस्कार करून जाते)
पुतणे : कोण म्हणायचं हे? कारण यांना पूर्वी कधीही बघितलेलं नाही.
काका : ज्योतिषी. कुणीतरी त्यांना मी येथे राहतो सांगितले व ते आले. (पुतणे समजून जातात)
पुतण्या : आपल्या पक्षाला मरगळ आलेली वाटते. आपण पाठीमागून अनेक बंद, मोर्चे, संप घडवून आणले पण काही उपयोग झाला नाही. जळगाव सांगली गेले हातातून. कित्येक पंचायतीमध्येही आपला पक्ष कमी पडतोय.
काका : बरं मग आपलं काय म्हणणं आहे?
पुतणे : मी असं म्हणतो की पक्षात कार्यकारी अध्यक्षपद वगैरे निर्माण करा; मग बघा आगामी निवडणुकीत मी प्रचाराची राळ उडवून देतो.
काका : कोण तुम्ही? (दुष्काळग्रस्तांसमोर धरणाविषयी कसे बोललात?) एकदम काय झाले?
पुतणे : हे बघा स्पष्टच बोलतो दोन महानगरपालिका गेल्या त्यात आता तुम्ही मध्येच सातारच्या राज्यांसमोर पंगा घेतलाय व प्रधानमंत्र्यांना निर्दोष घोषित करून टाकले आहे. त्यामुळे सर्वत्र पक्षाचे नुकसान होत आहे असे वाटले म्हणून आलो.
काका : असं होय (मनात सहकारी मित्र पक्षांच्या बाईंनी पोराला अध्यक्ष केले अजून काय पक्षाचं ते वाटोळं करणार ते कोण जाणे तसेच मुंबापुरीतही छात्र युवराज उदयाला येत आहेत. डीएमकेही करुणानिधी पुत्राकडे गेला) म्हणून तुम्ही येथे आलाय होय?
पुतणे : तसं नाही आपले अन्वर भाई सुद्धा पक्ष सोडून गेले सर्वत्र अस्वस्थता आहे. आपल्याला सावध करण्याकरता आलो.
काका : ठीक आहे मी विचार करेन पण मला हे सर्व कार्यकारिणी मंडळावर मांडावे लागेल व तू तर अधिवेशनालाही आला नाहीस? (इतक्‍यात काकांचा फोन वाजतो फोन उचलून ते म्हणतात हा बेटा बोल.काय घरी येत आहेस? ये ये मी आहेच. फोन ठेवतात) बरं या तुम्ही बघू काय करायचं ते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)