कलंदर : कोजागिरी (मंत्र्यांची) 

उत्तम पिंगळे 
परवाचीच गोष्ट एका अलिशान हॉटेलमध्ये महाष्ट्रातील दोन मंत्री डिनरसाठी आले होते. दोघेही ‘राजे उधोजींचे’ खास सरदार होते. आता आम्ही पत्रकार कुठेही जात असतो व नेमके त्यावेळी तिथे होतो. अगदी बाजूच्याच टेबलावर बसलो होतो. त्यांच्या बोलण्यावरून एक कोकणातील व एक मराठवाड्यातील होते. दोघेही अगदी रिलॅक्‍स वाटत होते. मधूनच थंड पेयांचा आस्वाद घेत होते.
मग एक म्हणाले की, बरे झाले दसरा मेळाव्याला साहेबानी काही राज्य सरकारवर टीका केली नाही. दुसरेही तेच म्हणाले की, एक तर आता निवडणुका जवळ आल्या आहेत बरं त्यात पाठिंबा वगैरे काढणे किती महागात पडले असते? त्यात आपण पडलो राज्यमंत्री म्हणजे आपल्यावरही साहेब आहेत आणि अशावेळी आपल्याला बाहेर पडावयास लागणे खूपच धोकादायक होते. एका अर्थी साहेबांनी राममंदिराचा विषय घेतला हे चांगले झाले.
मग पहिले म्हणाले की, आमच्या मराठवाड्यात आताच दुष्काळ जाणवू लागला आहे त्यात निवडणुकीचं वर्षे, सरकारात राहिले तर काही तरी कामे करता येतील. आजूबाजूचे आमदारदेखील किमान मंत्री आहे म्हणून मान ठेवतील. आता उलट सरकारी फौजफाटा वापरून जिल्ह्याची कामे करून दाखवावी लागतील. लोकांच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे. बघू आता काय करायचे ते. दिवाळीत चार दिवस गावी जातोय तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलतो. त्यावर दुसरे महाशय म्हणे की, तुमच्या मराठवाड्यात पाणी पडत नाही म्हणून दुष्काळ व आमच्या कोकणात पाणी अडत नाही म्हणून जानेवारीनंतर दुष्काळच म्हणा. पाणी अडवण्याची कामे करू तेवढी थोडी त्यात पक्षीय राजकारणही येत आहे. द्रुतगती मार्गाचे काम चालू आहे मग त्यावरच्या तक्रारी, कार्यकर्त्यांची कामे, सर्वच कठीण होत आहे. त्यातच कार्यकर्त्यांचे आपापसातील वाद वाढत आहेत.
महामार्ग मार्गी लागतोय तोच जैतापूरचं भूत उभं राहतं. गावी गेल्यावर लोकं व कार्यकर्त्यांचा गराडा पडतो दोन दोन दिवस कमी पडतात. त्यातच सरकारमधून बाहेर पडलो तर कसं काय होणार हाच विचार करत होतो. आता थोडा धीर आला आहे की सरकार पडणार नाही. त्यावर दुसरे महाशय म्हणे की, अरे बाबा सरकार तसेही हे पडणार नाही, आपणच तोंडघशी पडू. आता दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणे मंत्रिमंडळ विस्तार आहे. थोडी धाकधूक आहे. पण तसा काही प्रॉब्लेम नाही, उलट कॅबिनेटची लॉटरी लागली तर उत्तमच. दोघेही थोडे थोडे स्टार्टर फिनिश करतात व मेन कोर्स आणण्याची खूण करतात.
मग पहिले म्हणतात की, साहेबांनी राम मंदिरात हात घातला हे चांगले झाले त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे आपण राज्य सरकारच्या विरोधी नाही तर केंद्राचा आहोत. दुसरे म्हणजे आता शेवटच्या वर्षात काही तरी दिसतील अशी कामे करून दाखवावी लागणार आहेत ती करता येतील. पब्लिकमध्ये बोलायला काय हो की राजीनामे खिशात घेउन फिरतो पण प्रत्यक्षात फार अवघड आहे.वरवर दादागिरी दाखवावी लागते.आता बघू या दिवाळीत काय लॉटरी लागते का. त्यावर दुसरे म्हणे कि साहेबांनी पाठिंबा काढला नाही हीच लॉटरी समजा व कामाला लागा. मग पहिले वेटरकडे पाहून बोलतात ‘अरे चिकन लाव जल्दी भाई! (येथे हिंदीतच बोलतात बरे.. . )
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)