#कलंदर : कॉंग्रॅट्‌स इम्रान खान… 

 – उत्तम पिंगळे 

स्थळ बर्मिंगहॅम, पहिली भारत इंग्लंड कसोटी चालू आहे. लंचब्रेकमध्ये सुनील गावसकर बसलेले आहेत. सूपचा आस्वाद घेत आहेत व दोन टेबले सोडून इयान बोथमही तेच करत आहे. दोघं एकमेकांना हाय करतात. इतक्‍यात काहीतरी आठवल्यासारखं करून गावसकर फोन काढतात व लावतात इम्रान खानला.
गावसकर : हाय इमी, गावसकर हिअर…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इम्रान : हाय लिटिल मास्टर…
गावसकर : सर्वात प्रथम तुझे हार्दिक अभिनंदन कारण सर्वात जास्त जागा मिळवून तुझा पक्ष पहिला आलेला आहे (इम्रानला मराठी समजतं बरं)
इम्रान : अरे मास्टर बहुत शुक्रिया. .
गावसकर : मी ऐकले. आपला क्रिकेटर एका देशाचा पंतप्रधान होतोय याचा खूप आनंद झाला.
इम्रान : बात सही है और अभी कुछ एमपी तथा खासदार गोळा करायचे आहेत. आमच्याकडे 272 पैकी 172 जागा लागतात मला 116 मिळाल्या आहेत.
गावसकर : पण बाकी पक्षांना खूपच कमी आहेत.
इम्रान : हा बऱ्याच छोट्या छोट्या पक्षांना जागा मिळालेल्या आहेत.

गावसकर : राजकारण म्हटल्यावर आता त्यांच्याशी तडजोड करायला लागेल.
इम्रान : एकदम सही बोला आपने आता त्यांच्या खूप मागण्या येत आहेत.
गावसकर : हा ठीक होईल बहुतेक. आणि आर्मी वाले काय म्हणताहेत?
इम्रान : आर्मीने तो इलेक्‍शन में बहुत सबको सपोर्ट किया था.
गावसकर : पण तुला नंतर त्यांचे ऐकावे लागेल, असा इतिहास आहे .
इम्रान : छोडो. अभी मुझे ज्यादा सीट मिलने के बाद आर्मी से कुछ डिक्‍टेशन वगैरे नहीं है.
गावसकर : आमच्याही अपेक्षा आहेत की आपल्या दोन्ही देशात भाईचारा वाढला पाहिजे व नेहमीचे सीजफायरचे उल्लंघन थांबले पाहिजे तरच संबंध सुधारतील. त्यानंतर क्रिकेट, सिनेमा व इतर संस्कृतीची देवाणघेवाण वाढेल, हे तू पाहावे.

इम्रान : जरूर मेरी यही कोशिश होगी कि हिंदुस्तान से संबंध अच्छे हो.
गावसकर : नवनवीन खेळाडू भारतातही येतील, आयपीएलमध्ये दिसतील. तो अफगाणिस्तानचा छोटा बघतोस ना?
इम्रान : हिंदुस्तान से संबंध सुधारना मेरी कोशिश होगी और मैं आर्मी को भी नहीं कहूंगा.
गावसकर : और एक बात… (इतक्‍यांत अजून एक फोन वाजतो. इम्रानचा पीए फोन घेतो. जनरल कमर बाजवा पाक आर्मी चीफ यांच्या ऑफिसमधून. सहकारी कावराबावरा होऊन सांगतो, “साब जी आर्मी हेडकॉर्टर से फोन है. (इम्रान खुणेनं गप राहायला सांगतो)

इम्रान : ठीक है मास्टरजी थोड़ा और एक फोन हैं, इयान बोथम फोन कर चुका है. अभी मैं थोडा वह लेता हूं. बाद में हम बात करेंगे. फिर एक बार शुक्रिया खुदा हाफिज.
गावसकर : ओके ओके… (गावसकरांचा लक्षांत येते की हा खोटे बोलत आहे कारण सहकाऱ्याचा आवाज ऐकू आलेला असतो आणि दुसरे म्हणजे बोथम समोरच्या टेबलावर दुसरे सूप घेऊन आरामात आस्वाद घेत असतो. गावसकरांच्या मनात विचारही येतो “पाक आर्मी’ म्हणजे कुत्र्याचं शेपूट नळीत घातले तरी शेवटी ते वाकडंच…)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)