कलंदर : काळ, वेळ व भोवळ   

उत्तम पिंगळे 

काळ बदलला तरी काही बदल काळानुरूप व्हायला हवे, ते न झाल्यामुळे काही वेळ नसती पंचाईत होते. नुकताच राहुरीतील ‘भोवळ’ प्रसंग घडून गेला व त्यानंतर वेळ व भोवळ यांच्यात वादावादी झालीच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोवळ – हीच वेळ गाठलीस मला द्या कार्यतप्तर व्यक्तीवर झेप टाकण्यासाठी?
वेळ – मी काय केले? चांगला दीक्षांत समारंभ चालला होता व मी वेळ असल्यामुळे मला तिथे जाणे आवश्‍यक होते.
भोवळ – बरोबर तू आणि मी एकाच ठिकाणी आलो तर मला त्या व्यक्तीला भोवळ द्यावीच लागते तुला तेथे त्याच वेळेस का यावेसे वाटले.
वेळ – आजवर मी दीक्षांत समारंभ विविध विद्यापीठात पाहिले आहेत पण कधीही भोवळ पाहिली नाही.
भोवळ – बरोबर आहे. राहुरीला दीक्षांत समारंभाला भारदस्त गाऊन परिधान केल्यामुळे आपले रोड हिरो (चांगल्या अर्थानेच बोलत आहे) आपले केंद्रीय मंत्री यांची शुद्ध हरपली त्यांना भोवळ आली. प्रथम मी त्यांना एक छोटासा झटका दिला पण त्यांनी तो गाऊन काढला नाही त्यामुळे मला नाईलाजाने दुसरा झटका द्यावा लागला.
वेळ – होय पण त्यामुळे कार्यक्रमात विरस झाला त्याचे काय? (त्यांची चर्चा ऐकून काळ त्यांच्या समोर उभा ठाकला)
काळ – काय वेळ आणि भोवळ दोघंही एकाच व्यासपीठावर म्हणजे कुणालातरी तोंडघशी पाडणार?
वेळ – नमस्कार आपल्याला तर माहीत आहे काय झाले ते. आपण तर तेथे साक्षीदार होताच. माझे हेच म्हणणे होते की एवढ्या कर्तृत्ववान व गतिशील व्यक्‍तीवर भोवळने घाला घालावयास नको होता.
भोवळ – (काळाकडे पाहून) पण मला या वेळेनेच तेथे गाठल्यामुळे माझा नाइलाज झाला.
काळ – थांबा आपापसात उगाच भांडू नका. मला माहीत आहे की असा गाऊन बहुतेक विद्यापीठात पदवीदान समारंभात परिधान केला जातो. ब्रिटिश काळातील ते एक कर्म अजूनही तसेच चालू आहे. अर्थात, काही विद्यापीठाने त्यात दुरुस्ती केलेली आहे. पण बहुतेक सर्वच विद्यापीठात अजून तीच परंपरा चालू आहे. तिकडे युरोपियन देशांमध्ये थंड वातावरण असल्यामुळे त्यांना ते तेथे ठीक होते आपण नुस्ती कॉपी केली.
भोवळ – काही व्यक्तींना अशा भारदस्त गाऊन घातल्यामुळे गुदमरल्यासारखे होते व त्यातूनच हा प्रसंग घडला.
काळ – बरोबर आहे कारण आपण अशाच काही चाकोरीबद्ध पद्धतीतून आजूनही बाहेर पडलेलो नाही. त्या देशात थंड हवा असल्यामुळे शर्टवरील टाय ही आवश्‍यक असते त्यामुळे थंड हवा शर्टाच्या आतमध्ये जात नाही. आपण आपलं काहीही न समजता अंधानुकरण करीत आहोत.आपले पदवीदान समारंभात प्रामुख्याने उन्हाळ्यातच होतात व तसाही भारत थंड प्रदेश नाही.
वेळ – मग आता काय? कारण मी व भोवळ एकाच वेळी एकाच व्यक्ती जवळ आले की असेच घडते.
काळ – हं. आता या ड्रेसकोडवर परत चर्चा होत राहील व बहुधा आपला पारंपरिक साधा वेश, कुडता, पायजमा व वर उपरणे (काही विद्यापीठांत असे सुरू झालेले आहे) हा पोशाख घातला जाईल व तसेच घडणे आवश्‍यक आहे. यामुळे आपण परकीयांचे जोखडही उघडून देऊ. स्वदेशी वेश परिधान करू कारण ही पद्धती रूप बदलली गेली नाही.(परिवर्तन संसार का नियम है।) हे येथे विसरले गेले. असो तुम्हा दोघांचीही चूक नाही काळानुरूप बदल घेतला गेला हवा होता. या प्रसंगामुळे आता याचा पुन्हा विचार केला जाईल. पण या सर्व प्रकरणाने तडफदार व काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असे घडले याचा मलाही मनापासून खेद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)