कलंदर: कर्ज…

उत्तम पिंगळे

मराठवाड्यातील एका दुष्काळी गावात राम्या शांतपणे शिवाराकडे पाहात बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाम्या : काय रामभाऊ घराला व गोठ्याला कोणते पत्रे लावणार?
राम्या : इथं घशाला कोरड पडण्याची वेळ आली आहे. तू घर व पत्र्याच्या गोष्टी करत आहेस?
शाम्या : अरे, असे झाले तरी काय?
राम्या : काय झालं? आता हे बघ या वेळीचं पीक गेलं आणि त्यात ‘बा’ मोठीच्या लग्नाचा कांगावा करतोय. पोरीला पिवळी कर म्हनतोया. आमच्यासमोर लगीन झालं म्हणजे बरं. उद्या काय मी हाय का नाय, असं बोलतोय.
शाम्या : मग उडव की बार आता, सगळीकडे लग्नाची धूम चालूच आहे.
राम्या : तोच विचार करतोय. आता लग्न जमलं म्हणजे एक एकरचा तुकडा हुंडा म्हणून द्यावा लागेल. म्हणजे एक एकर कमी झाला. बाकीच्या खर्चाचे कसे जमणार?
शाम्या : आहे त्या जमिनीवर कर्ज घे!
राम्या : कर्ज म्हणजे सात बारावर बॅंकेचा ठप्पा लागेल आणि एकदा ठप्पा लागला की मग तो काढाया फार कठीण जाईल. नगं नगं.
शाम्या : अरे मग कसे पैसे जमतील?
राम्या : तोच विचार करतोय काय समजत नाही बघ. (इतक्‍यात शाम्याचा फोन वाजतो)
शाम्या : बोल भाई काय म्हणतो? कुठं? अरे हित राम्याचे शेतात हाय.
शाम्या : तू येऊन जा हीतं तोवर मी तोपर्यंत राम्याला थांबवतो. (थोड्याच वेळात भाई व दोन चार पोरं येतात. राम्या शाम्या उभे राहून भाईला नमस्कार करतात.)
भाई : काय रामभाऊ कसली चिंता करताय? शाम्या म्हणतो तसं कर्जाचा अर्ज आपल्या बॅंकेला टाका आपण लागेल दोन लाख मंजूर करून देऊ.
राम्या : पण जमीन ठेवा गहाण…
भाई : मग कसं मिळेल कर्ज? अरे, गहाण म्हणजे फक्‍त नावाला गहाण आता बघ इलेक्‍शनच्या टायमाला तू कर्ज घे; त्याचे एक दोन हप्ते भर अन गप रहा.
शाम्या : मग हे कर्ज भाई मागे लागून पुढच्या वर्षी पुन्हा माफ करतील.
राम्या : मग मी कशाला कर्ज काढू? (भाई एक फॉर्म काढून शाम्याला देतात; समजावतात आणि निघूनही जातात)
राम्या : (कागदांकडे पाहात) काय करावं काय टकूरं चालत नाय बघ.
शाम्या : तू कर्ज घे. भाईकडे दोन लाखांचे कर्ज मागितल्यावर आपल्याला त्या बॅंकेतल्या लोकांचं काय तरी बघावं लागेल. हातामध्ये एक-सव्वालाख मिळतील.
राम्या : पण दोन लाखांचे कर्ज आहे ना?
राम्या : अरे सर्व नंतर माफ होणार आहे. भाई सगळं माफ़ करतील मग त्यांच्यासाठी थोडा खर्च होईल. आता निवडणुकांचा टाइम आहे. नंतर बॅंक लोन माफ होईल. सात बारा कोरा होईल. आणि उतारा, मी जामीन राहतो. राम्या सात बारा व आधार कार्डाची कॉपी आणतो. समोर दिलेल्या फॉर्मवर अंगठा लावतो)
शाम्या : आता लाखभर कर्ज मिळेल ते लग्नात उडवून टाक. कर्जाची चिंता करू नको भाई सर्व माफ करून देईल. (उठून घाईघाईनं जातो.)
(राम्या एकीकडे शेताकडे पाहात दुसरीकडे हातावरील अंगठ्यावरच्या शाईकडे पाहात विचार करत बसतो.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)