बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा नव्या चित्रपटामधील फर्स्ट लूक नुकताच व्हायरल झाला आहे. करण जोहरच्या ‘कलंक’ या आगामी चित्रपटामध्ये माधुरी झळकणार आहे. या चित्रपटामध्ये माधुरी एक महत्वपूर्ण भूमिका करणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. यावेळी सेटवरील माधुरीचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये माधुरी एका क्रेनवर उभी असल्याचे पहायला मिळत आहे. यात माधुरीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून त्यावर डिजाइनर झुमकेही घातले आहेत.

या चित्रपटामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त हे स्टारकास्ट झळकून येणार आहेत. विशेष म्हणजे ब-याच काळानंतर माधुरी आणि संजय दत्त एकत्र काम करणार असल्यामुळे या दोघांची चित्रपटातील केमिस्टी पहायला चाहते उत्सुक असल्याचं दिसून येतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)