कऱ्हाकाठी “आचार्य अत्रे पुरस्कारां’चे वितरण

सासवड-सासवड येथील आचार्य अत्रे यांच्या सासवड (ता. पुरंदर) या जन्मगावी त्यांच्या 49व्या स्मृतिदिनानिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अत्रे पुरस्कार वितरण झाले. यावेळी लेखक प्रा. नलगे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, विनोदी कलाकार वंदन राम नगरकर यांना कलाकार पुरस्कार व ज्येष्ठ पत्रकार रमेश झंवर यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला.
सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरीत करण्यात आले. सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी भूषविले. याप्रसंगी कार्यवाह दशरथ यादव, उपाध्यक्ष श्रीकृष्ण नेवसे, कोषाध्यक्ष वसंत ताकवले, सहसचिव हनुमंत चाचर, गौरव कोलते, कला फडतरे, शिवाजी घोगरे, हेमंत भोंगळे, नी. रा. मेमाणे, कुंडलिक मेमाणे, शामराव महाजन, तानाजी कोलते, नगरसेवक प्रवीण भोंडे, डॉ. भरत तांबे, चंद्रकांत टिळेकर उपस्थित होते.
संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ आचार्य अत्रे यांनी शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांच्या सहकाऱ्याने उभी केली. आज मात्र सर्व जगात स्वार्थ बोकाळला आहे. आज अत्रे असते तर या प्रवृत्तीवर तुटून पडले असते. आचार्य अत्रे गेल्यावर महाराष्ट्र पोरका झाला तो अजूनही पोरकाच आहे त्यामुळे त्यांना विसरणे शक्‍यच नाही अशा शब्दात आचार्य अत्रे “साहित्य’ पुरस्काराचे मानकरी व प्रसिद्ध लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी भावना व्यक्‍त केल्या.
वंदन नगरकर यांनी आचार्य अत्रे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचे सार्थक करीन असे सांगून रामनगरी या एकपात्री प्रयोगातील काही प्रसंग सादर केले. पत्रकार पुरस्कार प्राप्त रमेश झंवर यांनी अत्रे यांच्या सहवासातील आठवणी जागविल्या. तर प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी अत्रे यांच्या अनेक पैलूंचे वर्णन सांगितले. कार्यक्रमाचे सुरुवातीस पुरंदर हायस्कुलच्या वतीने स्वागतगीत सादर झाले. दरम्यान, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत परिषदेचे उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, ऍड. प्रकाश खाडे, डॉ. राजेश दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, सूत्रसंचालन सचिन धनवट तर प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण यांनी आभार मानले.

  • जगतापांचा विसर
    आचार्य अत्रे लहानपणी कऱ्हा नदीच्या पात्रात पोहत असताना गटांगळ्या खाऊ लागले त्यांना बुडताना पाहून भिकोबा विष्णुपंत जगताप यांनी नदीच्या पात्रात उडी मारून अत्रे यांना वाचविल्याच्या प्रसंगाचा अत्रे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केलेला आहे. तसेच कोलते यांची सासुरवाडी जगतापांची असूनही आचार्य अत्रे प्रतिष्ठान व कार्यक्रमात जगतापांना वगळण्यात आले असे वक्‍तव्य राष्ट्रवादीचे युवा नेते महेश जगताप यांनी भाषणात करताच सभागृह हास्य कलोळात बुडाले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)