कर वसुलीतून ग्रामपंचायतींचा विकास – मोहिते पाटील

मंचर-ग्रामपंचायतीने आर्थिक उत्पादन वाढण्यासाठी जास्तीत जास्त कर वसुली केली पाहिजे. गावपातळीवरील कर वसुलीच्या माध्यमातून आता शासनाने ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोग देण्याचे ठरवले असल्याने प्रत्येक वॉर्डातील सदस्याने आपल्या वॉर्डातील शंभर टक्‍के करवसुली करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्‍त केले.
कळंब (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी औपचारिक भेट दिली. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, माजी सभापती वसंत भालेराव आणि आमचे सन 1992 सालापासून सलोख्याचे संबंध आहेत. ग्रामपंचायतीच्या करवसुलीप्रमाणे शासन आता चौदाव्या वित्त आयोगातून विविध विकास योजनांसाठी निधी देणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी करवसुलीसाठी सज्ज राहिले पाहिजे, असे मत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्‍त केले.
माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती वसंत भालेराव, तंटामुक्‍ती अध्यक्ष शिवाजी भालेराव, दिलीप ग्रामीणचे संचालक सुनील भालेराव, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष शशिकांत कहडणे, बाळासाहेब भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील श्रीशेटे, योगेश मोरे, नितीन पवार, गणेश साळवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)